IND vs PAK Asia Cup: एशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर विजय; शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला थरार

IND vs PAK Asia Cup: इमर्जिंग टीम्स एशिया कपमध्ये भारताच्या ए टीमने पाकिस्तानच्या ए टीमचा पराभव केला. यावेळी ७ रन्सने भारताचा विजय झाला आहे.
Ind Vs Pak
Ind Vs Paksaam tv
Published On

इमर्जिंग टीम्स एशिया कपमध्ये शनिवारी भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला आहे. या स्पर्धेतील दोन्ही टीम्सचा हा पहिला सामना होता. या सामन्यात टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये केवळ 183 रन्स केले होते. तर प्रत्युत्तरात पाकिस्तानची टीम केवळ 176 रन्स करू शकली.

टीम इंडियाच्या या विजयामध्ये गोलंदाजांनी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. भारत ए टीमकडून अंशुल कंबोजने सर्वाधिक विकेट्स घेत पाकिस्तान टीमच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

Ind Vs Pak
PAK vs ENG 2nd Test : पाकिस्तानने पराभवाचा वचपा काढलाच! इंग्लंडला मात देत ३ वर्षांनी घरच्या मैदानावर जिंकला टेस्ट सामना

पाकिस्तानसमोर १८४ रन्सचं लक्ष्य

भारत ए टीमने पाकिस्तान ए टीमसमोर 184 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. यावेळी भारताकडून कर्णधार तिलक वर्माने सर्वाधिक रन्स केले. यावेळी त्याने 35 बॉल्समध्ये 44 रन्स केले. त्याचप्रमाणे अभिषेक शर्माने 35 रन्सची शॉर्ट पण स्वीट खेळी खेळली. याशिवाय प्रभसिमरन सिंग आणि निहाल वढेरा यांनी 36 आणि 25 रन्स करत टीमच्या स्कोरमध्ये हातभार लावला.

पाकिस्तानची बॅटींग ऑर्डर झाली फेल

टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. यावेळी मोहम्मद हॅरिस आणि ओमर युसूफ 21 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर यासिर खान आणि कासिक अकरम यांच्यामध्ये ५४ रन्सची पार्टनरशिप झाली. मात्र टीमला विजय मिळवून देण्यासाठी ते अपयशी ठरले. अराफत मिन्हासने 41 आणि अब्दुल समदनेही 25 रन्स केले. मात्र ७ रन्सने पाकिस्तानचा पराभव झाला.

Ind Vs Pak
WTC Points Table: ...तर टीम इंडियाचं होणार मोठं नुकसान; पाकिस्तानच्या विजयामुळे WTC च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल

टीम इंडियाचा अंशुल कंबोज चमकला

टीम इंडियाच्या गोलंदाजांमध्ये अंशुल कंबोजने चांगला खेळ दाखवला. त्याने ४ ओव्हर्समध्ये ३३ रन्स देत ३ विकेट्स घेतले. याशिवाय रसिक दार सलाम आणि निशांत सिंधूने 2-2 विकेट्स घेतले. या स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना आता 21 ऑक्टोबर रोजी UAE विरुद्ध रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com