Team India
team indiayandex

T20 World Cup : सूर्यादादाकडे विश्वविक्रमाची संधी, आज विश्वचषकाची सुरूवात, कुठे अन् कधी पाहाल सामना?

India vs USA, T20 World Cup 2026 : टी२० विश्वचषक २०२६ मधील भारताचा पहिला सामना आज अमेरिकेविरोधात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हेड टू हेड रेकॉर्ड, प्लेइंग ११, सामना वेळ आणि लाईव्ह प्रक्षेपणाची संपूर्ण माहिती वाचा.
Published on

India vs USA Head to Head Records, T20 World Cup 2026 News in Marathi : आजपासून टी२० विश्वचषकाच्या थराराला सुरूवात होणार आहे. गतविजेत्या भारतीय संघाचा पहिला सामना अमेरिकेविरोधात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ लागोपाठ दुसऱ्यांदा चषक उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ विजेतेपादाचा दावेदार मानला जातोय. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी२० विश्वचषकावर नाव कोरले होते. यंदाच्या वर्षीही भारतीय संघाकडे विजेतेपदाची संधी आहे. (India vs USA T20 World Cup 2026 match time and venue)

भारत-अमेरिका Head to Head Records

भारत आणि अमेरिकामध्ये आतापर्यंत फक्त टी२०चा एकच सामना झालाय. २०२४ च्या विश्वचषकात भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये न्यूयॉर्कच्या मैदानात लढत झाली होती. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना ११० धावा केल्या होत्या. भारताने ७ विकेट राखून सहज विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका यांच्यात लढत होत आहे. भारताकडे नेट रनरेट वाढवण्याची संधी आहे.

Team India
मध्यरात्री मोठी घडामोड, १२ वाजता खासदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ३१ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात कारवाई

पहिला सामना कधी अन् कुठे पाहाल?

भारत आणि अमेरिका यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता नाणेफेक होईल. सात वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरवर हा सामना पाहता येईल. त्याशिवाय जिओ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवरही थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. डीडी स्पोर्ट्सवरही सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

Team India
ZP Election : पुण्यात मतदानाआधीच राडा, अजित पवारांच्या उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, शेकडो लोक रस्त्यावर

वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी -

अमेरिकेविरोधात दणक्यात सुरूवात करत भारतीय संघाकडे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची मोठी संधी आहे. २०२४ टी२० विश्वचषकात टीम इंडियाने सलग ८ सामन्यात विजय मिळवला होता. आता पहिल्याच सामन्यात भारताने विजय मिळवल्यास टी२० विश्वचषकात भारताचा सलग नववा विजय ठरले. अमेरिकेचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ टी२० विश्वचषकात सलग सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरेल. आतापर्यंत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी टी२० विश्वचषकात सलग ८ सामन्यात विजय मिळवलाय.

Team India
महाराष्ट्राचे आमदार लंडनच्या दौऱ्यावर, कोण कोणत्या नेत्यांचा समावेश, पाहा यादी

प्लेईंग ११ मध्ये कोण कोण? Team India playing XI against USA T20 WC

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकु सिंह, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरूण चक्रवर्ती

कसे आहेत दोन्ही संघ -

भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंगटन सुंदर

यूएसए संघ: मोनांक पटेल (कप्तान), जेसी सिंह, एंड्रीज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, सैतेजा मुक्कमाला, संजय कृष्णमूर्ति, हरमीत सिंह, नोस्टुश केनजिगे, शैडली वान शल्कविक, सौरभ नेत्रवाळकर, अली खान, मोहम्मद मोहसिन, शुभम रंजाने.

Team India
काटा उलटा फिरायलाय, जयंत पाटील थोड्याच दिवसात भाजपात, सत्ताधारी आमदाराचा मोठा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com