IND vs NZ : दुष्काळात तेरावा महिना! लाईव्ह सामन्यात भारताचा स्टार खेळाडू गंभीर जखमी

IND vs NZ : लाईव्ह सामन्यात भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे ऋषभ पंतच्या ऐवजी ध्रुव जुरेल मैदानात उतरला.
दुष्काळात तेरावा महिना! लाईव्ह सामन्यात भारताचा स्टार खेळाडू गंभीर जखमी
IND vs NZ : Saam tv
Published On

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला कसोटी सामना बेंगळुरुमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारताच्या खराब फलंदाजीनंतर भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत गंभीर झाला आहे. विकेटकिपिंगदरम्यान, ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला आहे.

लाईव्ह सामन्यादरम्यान ऋषभ पंत गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. ऋषभ नेमका किती जखमी झालाय, याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नाही. जखमी झाल्यावर ऋषभला चालता देखील जमत नव्हतं. त्यानंतर ऋषभला मैदानातून बाहेर नेण्यात आलं. पंतच्या ऐवजी विकेटकिपिंगसाठी ध्रुव जुरेल मैदानावर आला. पंत गंभीर जखमी झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. पंतची जखमी किती गंभीर आहे, याची माहिती अद्याप हाती आलेली नाही.

दुष्काळात तेरावा महिना! लाईव्ह सामन्यात भारताचा स्टार खेळाडू गंभीर जखमी
IND vs NZ : काय हा प्रकार! रोहित २, विराट ०, राहुल ०, फक्त ४६ धावांत भारताचे शेर ढेर, टीम इंडियाचं नेमकं चुकलं काय?

दुखापत झाल्यानंतर पंतला धड चालता येत नव्हते. त्यामुळे ऋषभ पंतला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर पंतच्या जागी विकेटकिपिंगसाठी ध्रुव जुरेलला मैदानात बोलवण्यात आलं. कसोटी सामन्यातील ३७ व्या षटकात ही घटना घडली. रवींद्र जडेजाने टाकलेल्या गोलंदाजीच्या वेळी ही घटना घडली. रवींद्र जडेजाचा चेंडू पंतच्या गुडघ्याला लागला. अनेक महिने मैदानाबाहेर राहिल्याने बांगलादेशविरोधातील कसोटीत पदार्पण केलं होतं. या मालिकेत पंतने चांगली कामगिरी केली होती. त्याने बांगलादेशविरोधात शतक लगावलं होतं.

दरम्यान, बेंगळुरु कसोटी सामन्यात टीम इंडियाविरोधात न्यूझीलंडचं पारडं जड आहे. भारताला ४६ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडचा संघ चांगली फलंदाज करत आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने १०० हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

दुष्काळात तेरावा महिना! लाईव्ह सामन्यात भारताचा स्टार खेळाडू गंभीर जखमी
IND vs NZ, 1st Test, Day 2, Highlights: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, न्यूझीलंडकडे 134 धावांची आघाडी

पंतने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण...

या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंतने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. या सामन्याच्या २१ व्या षटकात विलियमच्या चेंडूवर यशस्वी जायस्वाल बाद झाला. यशस्वी बाद झाल्यानंतर टीम इंडियाचे एकामागून एक गडी बाद झाले. भारतासाठी पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. तर भारताच्या ९ फलंदाजांना अवघा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडिया ३१.२ षटकात ४६ धावांवर सर्व बाद झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com