Rishabh Pant Birthday: गाबा गाजवलं, अपघातात बचावला.. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कमबॅक, वाचा रिषभ पंतचा प्रवास

Rishabh Pant News In Marathi: भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आपला २७ वा वाढदिवस साजरा करतोय.
Rishabh Pant Birthday: गाबा गाजवलं, अपघातात बचावला.. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कमबॅक, वाचा रिषभ पंतचा प्रवास
rishabh panttwitter
Published On

Rishabh Pant Journey: ती रात्र होती ३० डिसेंबर २०२२ ची. वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोष सुरु होता. भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतही दिल्लीहून आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी देहराडूनला जात होता. मात्र त्याने कधी विचारही केला नसेल, अशी घटना घडली. सकाळी ५:३० च्या दरम्यान रिषभ पंतची भरधाव वेगाने धावणारी कार उलटली.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी क्षणाचाही विलंब न करता, त्याला रुग्णालयात नेलं. त्याला इतक्या जखमा झाल्या होत्या की, त्याला उठून उभं राहणही कठीण होतं. आता रिषभ पंतच्या कारकिर्दीला फुलस्टॉप लागला, अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र हा पठ्ठ्या उठला आणि फुलस्टॉपला लाथेने तुडवत, आपल्या नव्या इनिंगला सुरुवात केली... आणि इथून सुरु झाला रिषभ पंत २.० चा प्रवास. आज रिषभ पंत आपला २७ वा वाढदिवस साजरा करतोय.

दुखापतीत गंभीर जखमी

डिसेंबर २०२२ रोजी रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला. या अपघातात तो थोडक्यात बचावला. या अपघातानंतर तो काही महिने बेडवरच होता. त्याला धावणं सोडा, साधं चालताही येत नव्हतं. १५ महिने त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केलं.

Rishabh Pant Birthday: गाबा गाजवलं, अपघातात बचावला.. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कमबॅक, वाचा रिषभ पंतचा प्रवास
कसोटीनंतर आता रंगणार T-20 चा थरार! वाचा केव्हा होणार IND vs BAN यांच्यातील पहिला सामना?

त्याला आयपीएल २०२४ स्पर्धेत कमबॅक करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रिषभ भारतीय संघात केव्हा कमबॅक करतोय अशी चर्चा सुरु होती. भारताने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. या विजयात रिषभ पंतने मोलाचं योगदान दिलं. आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत रिषभ पंतने दमदार कमबॅक केलं आणि पहिल्याच कसोटीत शानदार शतकी खेळी केली.

Rishabh Pant Birthday: गाबा गाजवलं, अपघातात बचावला.. क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कमबॅक, वाचा रिषभ पंतचा प्रवास
IND vs BAN: चेन्नई कसोटी जिंकताच BCCI ची मोठी घोषणा! दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

गाबा कसोटीतील हिरो

रिषभ पंतला गाबा कसोटीतील हिरो असं देखील म्हटलं जातं. संघातील प्रमुख खेळाडू संघाबाहेर असताना रिषभ पंतने ऑस्ट्रेलियामध्ये धुमाकूळ घातला होता. गाबा हा ऑस्ट्रेलियाचा गड म्हटला जातो. इथे त्यांनी कधीच सामना गमावला नव्हता. मात्र रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकायला भाग पाडलं. 'टूटा है गाबा का घमंड..' हे वाक्य जेव्हाही तुमच्या कानावर येईल...' तेव्हा तुम्हाला रिषभ पंतने लाँग ऑफच्या दिशेने मारलेला चौकार नक्की आठवेल. या सामन्यात रिषभ पंतने ८९ धावांची शानदार खेळी केली होती. तब्बल ३३ वर्षांनंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने गाबाच्या मैदानावर कसोटी सामना गमावला होता. यासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली होती.

सर्वात वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा रिषभ पंतच्या नावावर आहे. २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्याने अवघ्या २८ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com