

न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारताच्या वनडे संघात पुन्हा बदल करण्यात आला आहे. यावेळी वेगवान गोलंदाज आकिब नबी याला पहिल्या तीन सामन्यांसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. वनडे मालिकेतून प्रसिद्ध कृष्णा बाहेर झाला आहे. त्यामुळं बीसीसीआयनं हा निर्णय घेतला. आकिबची निवड चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी आधीच झाली होती. आता पहिल्या तीन सामन्यांतही तो खेळणार आहे.
आकिब नबी याचा वनडे संघात समावेश करत असल्याची माहिती बीसीसीआयने शनिवार, ३१ ऑक्टोबरला दिली. बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी आकिब नबी याला भारतीय संघात स्थान दिले आहे. त्याची आधी चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी संघात निवड केली होती. पण आता सुरुवातीच्या तीन सामन्यांतही त्याचा समावेश करण्यात आला आहे. याचाच अर्थ तो आता संपूर्ण वनडे मालिकेत भारतीय संघातून खेळणार आहे.
भारताचा संघ पुढीलप्रमाणे -
पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ पुढीलप्रमाणे असेल.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर बरार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, इशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी (पहिल्या वनडेसाठी), आकिब नबी
चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी असा असेल भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बरार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकूर, कुलदीप यादव.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.