Ind vs NZ Test : त्या ९ ओव्हर, सरफराज- रिषभ आऊट, भारत-न्यूझीलंड कसोटीला कलाटणी, न्यूझीलंडसमोर टार्गेट किती?

Ind vs NZ Test update : भारत-न्यूझीलंड कसोटीला कलाटणी मिळाली आहे. सरफराज आणि रिषभच्या खेळीमुळे संघाचा डाव सावरला.
त्या ९ ओव्हर, सरफराज- रिषभ आऊट, भारत-न्यूझीलंड कसोटीला कलाटणी, न्यूझीलंडसमोर टार्गेट किती?
Ind vs NZ Test Saam tv
Published On

India vs New Zealand 1st Test Day 4 : 'नर्व्हस नाइन्टी'चा शिकार झालेला रिषभ पंत आणि दीडशे धावा करून डावाला आकार देणारा सरफराज खान बाद झाल्यानंतर भारताचा दुसरा डाव गडगडला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याला अनपेक्षित कलाटणी मिळाली. भारताने न्यूझीलंडला १०७ धावांचं आव्हान दिलं आहे.

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्याचा चौथा दिवस आहे. भारताने टीम न्यूझीलंडसमोर १०७ धावांचं ठेवलं आहे. भारताने दुसऱ्या डावात ४६२ धावा कुटल्या. टीम इंडियाची धावसंख्या तीन गडी गमावून ४०८ धावा इतकी झाली होती. मात्र, सरफराज खान बाद झाल्यानंतर एका पाठोपाठ गडी बाद झाले. भारताने ५४ धावांमध्ये सात गडी गमावले.

त्या ९ ओव्हर, सरफराज- रिषभ आऊट, भारत-न्यूझीलंड कसोटीला कलाटणी, न्यूझीलंडसमोर टार्गेट किती?
Sarfaraz Khan: पंत रनआऊट होणारच होता, अचानक सरफराज जोरजोरात उड्या मारू लागला, मैदानात काय घडलं? Viral Video

भारताने पहिल्या डावात ४६ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने भारताविरुद्ध ४०२ धावा कुटल्या. यामुळे न्यूझीलंडला ३६५ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने सर्वाधिक १३४ धावा केल्या. न्यूझीलंडने भारतीय जमीनीवर आतापर्यंत कोणताही दोन संघातील मालिका जिंकली नव्हती. दोन्ही संघामध्ये १३ वा कसोटी मालिका सुरु आहे. भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर न्यूझीलंडचं नेतृत्व टॉम लॅथमकडे आहे.

त्या ९ ओव्हर, सरफराज- रिषभ आऊट, भारत-न्यूझीलंड कसोटीला कलाटणी, न्यूझीलंडसमोर टार्गेट किती?
Sachin Tendulkar reaction : सरफराजच्या शतकानंतर सचिन तेंडुलकरलाही राहावलं नाही!,युवा खेळाडूंमध्ये उत्साह भरवणारी पोस्ट!

सरफराजची चमकदार कामगिरी

सरफराजने या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. सरफराज शून्य धावांवर बाद झाल्यानतंर दुसऱ्या धावात १५० धावा कुटल्या. सरफराजच्या आधी नयन मोंगियाने १९९६ साली ऑस्ट्रेलियाच्या विरोधात उत्कृष्ट कामगिरी केली होती. तर १९५३ साली माधव आपटेने वेस्ट इंडिजविरोधात पहिल्या डावात शून्य धावावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या धावात नाबाद १६३ धावांची खेळी खेळली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com