Ind vs Eng T20 : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज ठरला व्हिलन, तिसऱ्या टी २० मध्ये डच्चू मिळणार; प्लेइंग इलेव्हन बदलणार

india playing eleven change for third t20 vs england : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी २० मालिकेतील तिसरा सामना उद्या, ७ जुलैला होणार आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
ind vs eng : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलाची शक्यता, 'व्हिलन' गोलंदाजाला डच्चू मिळणार
team indiabcci /x
Published On

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेआधी विजयीरथ सुरू असलेल्या भारतीय संघाचा एका विजयासाठी संघर्ष सुरू आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या मालिकेतील दोन सामन्यांत विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला. तर दुसरा सामना गमवावा लागला. इंग्लंडने चार विकेट राखून भारताला मात दिली. आता तिसरा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे. या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ज्या स्टार युवा गोलंदाजामुळं भारताला पराभूत व्हावे लागले, त्याला डच्चू दिला जाऊ शकतो.

एक ओव्हर अन् भारतानं दुसरा सामना गमावला

भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मंगळवारी, ७ जुलैला हा सामना होणार आहे. या सामन्यात आणखी एका तेजतर्रार गोलंदाजाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंना घेऊन खेळला होता. त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती संघात होते तरीही रवि बिश्नोईला संघात स्थान दिलं होतं. त्याच्यामुळेच पराभवाला सामोरे जावे लागले. सामना भारताच्या बाजूने झुकलेला होता. पण बिश्नोईने टाकलेल्या १७ व्या षटकात दोन नो बॉल फेकले. त्याच्या एका षटकात २९ धावा कुटल्या. तिथेच सामना हातून निसटला.

प्रिन्स यादवची एन्ट्री होणार?

या सामन्यात रवि बिश्नोईला एकही विकेट काढता आली नाही. ४ षटकांत त्याने ६० धावा दिल्या. पुढचा सामना ट्रेंट ब्रिजमध्ये होईल. रवि बिश्नोईला बाकावर बसवून, प्रिन्स यादवला संधी दिली जाऊ शकते. तो आयर्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यात तीन विकेट घेतल्या होत्या. पण त्यानंतरही त्याला बाकावर बसवले. आता त्याच्या पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत.

ind vs eng : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलाची शक्यता, 'व्हिलन' गोलंदाजाला डच्चू मिळणार
ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये सर्वात मोठा उलटफेर; अभिषेक शर्मानं पहिला नंबर गमावला; टॉप १० मध्ये कोण-कोण?

टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल

इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत दोन सामने झाले. त्यात अनुक्रमे १८९ आणि १९० धावा केल्या होत्या. पहिल्या सामन्यात इंग्लंडला फलंदाजी करता आली नाही. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने १९० धावांचा सहजगत्या पाठलाग केला. त्यामुळे भारताची तिसऱ्या सामन्यात पहिली फलंदाजी आली तर, २०० हून अधिक धावा कराव्या लागणार आहेत.

वैभव सूर्यवंशीला बऱ्याच प्रतीक्षेनंतर पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याला चांगली फलंदाजी करता आली नाही. पण दुसऱ्या सामन्यात तो चांगला खेळ करेल अशी अपेक्षा आहे. त्यानं नैसर्गिक खेळ केला तर तो नक्कीच संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मदत करेल, यात शंका नाही.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे - अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, सूर्यांश शेडगे, वॉशिंग्टन सुंदर.

ind vs eng : भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदलाची शक्यता, 'व्हिलन' गोलंदाजाला डच्चू मिळणार
ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये सर्वात मोठा उलटफेर; अभिषेक शर्मानं पहिला नंबर गमावला; टॉप १० मध्ये कोण-कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com