IND W vs PAK W: भारताकडून पाकिस्तानचा दारूण पराभव; टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा 'श्रीगणेशा'

IND W vs PAK W: महिला टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताकडून स्मृती मानधना सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली.
IND W vs PAK W:
INDIA THRASH PAKISTAN BY 64 RUNS IN WOMEN'S T20 WORLD CUP 2026 OPENERsaam tv
Published On

भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या 'गट अ' (Group A) मधील सलामीच्या सामन्यात ६४ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ ची शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १७० धावां केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १०६ धावांत गारद झाला. भारताच्या या विजयात दीप्ती शर्माने मोलाची भूमिका बजावली. तिने उत्कृष्ट गोलंदाजी करत पाच बळी टिपले.

यासह हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनीही फलंदाजीत शानदार योगदान दिले. तर दीप्ती शर्माने उत्कृष्ट गोलंदाजी करत पाकिस्तानी फलंदाजांना दबावात ठेवलं आणि मोठी खेळी करण्यापासून रोखलं. भारताने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला.

IND W vs PAK W:
Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

मंधानाची अर्धशतकी खेळी

या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही.५ चेंडूंत ६ धावा करून शफाली वर्मा बाद झाली. मात्र दुसऱ्या बाजूला स्मृती मंधानाने ४४ चेंडूंत ६८ धावांची धमाकेदार खेळी केली. तिने ९ चौकारांसह २ षटकारही मारले. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेली जेमिमाह रॉड्रिग्ज मात्र अपयशी ठरली. ती सात चेंडूंत फक्त एक धाव काढून बाद झाली.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूंत ३६ धावांची संथ खेळी केली. यासह रिचा घोषने १७ चेंडूंत ३४ धावा केल्या. अशाप्रकारे, भारताने २० षटकांत ६ बाद १७० धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानतर्फे गोलंदाजी करताना सादिया इक्बालने ४ षटकांत ४१ धावा देत २ बळी घेतले, तर फातिमा सनानेही २ बळी मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com