

Who will India pick between Kuldeep Yadav and Varun Chakravarthy in 1st T20 : टी२० विश्वचषकाची रंगीत तालीम आजपासून सुरूवात होणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज पहिला टी२० सामना होणार आहे. कटकमधील बाराबती स्टेडियमवर भारत आफ्रिकेविरोधात दोन हात करणार आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, शुभमन गिल दुखापतीमधून परतल्यानंतर पहिल्यांदाच मैदानावर परतणार आहे. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा पहिल्या टी२० सामन्यात सलामीला उतरतील, यावर कर्णधार सूर्यकुमार यादव याने शिक्कामोर्तब केलेय. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाची टी२० मधील कामगिरी शानदार राहिली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने २-१ बाजी मारली होती. आता सूर्यकुमारचा संघ घरच्या मैदानावर आफ्रिकेला पाणी पाजण्यासाठी सज्ज जाला आहे. गेल्या काही सामन्यावर नजर मारल्यास प्लेईंग ११ आणि फलंदाजीच्या क्रमांकामध्ये मोठा बदल झालेला पाहिलाय. पण या मालिकेत जास्त फेरबदल होण्याची शक्यता कमीच आहे.
पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाचे कॉम्बिनेशन कसं असेल, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या कमबॅकमुळे फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजीही मजबूत झाली आहे. त्यामुळे भारतीय संघ फक्त एकच स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरू शकतो. वरूण चक्रवर्तीऐवजी कुलदीप यादव याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वेगवान गोलंदाजांना मदत -
भारतीय संघाला गरज पडल्यास अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा फिरकी गोलंदाजीत कमाल करू शकता. बाराबाती स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे भारतीय संघ अतिरिक्त वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. शुभमन गिल तंदुरूस्त असल्याने तो सलामीला उतरेल, तर संजू सॅमसन याला मधल्या फळीत खेळावे लागेल. जितेश शर्मा विकेटकीपर म्हणून संघात आहे, पण संजू सॅमसनच्या आधी त्याला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
पहिल्या टी२० साठी भारतीय संघाची प्लेईंग ११
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.
आफ्रिकेची प्लेइंग-11:
एडेन मार्करम (कर्णधार), रीजा हेंड्रिक्स, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डेविड मिलर, मार्को यानसेन, डोनोवन फरेरा, कॉर्बिन बॉश, केशव महाराज आणि एनरिक नॉर्किया.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.