Asia Cup 2023 IND vs PAK: पाकिस्तानला पावसाचा होणार मोठा फायदा; टीम इंडियाचं मोठं नुकसान

IND vs PAK, Asia Cup 2023: पावसामुळे पाकिस्तानला मोठा फायदा होणार असून टीम इंडियाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
IND vs PAK, Asia Cup 2023 Updates:
IND vs PAK, Asia Cup 2023 Updates:Saam TV
Published On

IND vs PAK, Asia Cup 2023 Updates: कोलंबोतील हवामान खात्यात वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२३ सुपर-४ फेरीतल्या सामन्यात अखेर पावसाने खोडा घातलाच. पावसामुळे रविवारी होणारा सामना थांबवण्यात आला. (Latest Marathi News)

आता उर्वरित सामना सोमवारी म्हणजे आज होणार आहे. या पावसामुळे पाकिस्तानला मोठा फायदा होणार असून टीम इंडियाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. भारताविरुद्धच्या अतिशय महत्वाच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.

IND vs PAK, Asia Cup 2023 Updates:
IND vs PAK, Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याआधी क्रिडाप्रेमींसाठी गुड न्यूज; डेंजर बॉलरची टीम इंडियात एन्ट्री

मात्र, त्याच्या या निर्णयावर टीम इंडियाच्या सलामीच्या फलंदाजांनी अक्षरश: पाणी फिरवलं. पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बॅकफूटवर दिसणारा रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सामन्यात मात्र पाकिस्तानवर चांगलेच तुटून पडले. शुभमन-रोहितने पावर प्लेमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

दोघांनी १२१ धावांची ओपनिंग पार्टनरशीप केली. रोहितने ४९ चेंडूत ५६ धावा कुटल्या. यामध्ये ६ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांचा समावेश होता. तर शुभमनने ५२ चेंडूत ५८ धावांची सुरेख खेळी केली. त्याने १० सणसणीत चौकार लगावले. शतकी भागीदारीनंतर दोघेही एकापाठोपाठ एक बाद झाले.

त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलने टीम इंडियाचा डाव सावरला. सामना रंगत आला असताना मध्येच पावसाने खोडा घातला. त्यामुळे मुख्य दिवसाचा सामना पावसामुळे वाया गेला. रोहित-शुबमनच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने २ विकेट्स गमावून १४७ धावांपर्यंत मजल मारली.

पावसामुळे टीम इंडियाचं मोठं नुकसान

दरम्यान, भारत पाकिस्तान सामना मुख्य दिवशी पूर्ण न झाल्याने हा सामना ११ सप्टेंबरला खेळवण्यात येईल. यामुळे टीम इंडियाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण, पाकिस्तानविरुद्धचा सामना संपल्यानंतर टीम इंडियाला २४ तासांच्या आतच श्रीलंकाविरुद्ध खेळावं लागणार आहे. हा सामना १२ सप्टेंबर म्हणजेच मंगळवारी होणार आहे. त्यामुळे याचा टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानला होणार मोठा फायदा?

दुसरीकडे राखीव दिवशी सुद्धा पावसाने जर भारत-पाक सामन्यात खोडा घातला आणि सामना रद्द झाला. तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जातील. यामुळे पाकिस्तानचा मोठा फायदा होणार आहे. पाकिस्तानने ३ गुणांसह डायरेक्ट फायनलमध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण, पाकिस्तानने यापूर्वी बांग्लादेशविरुद्धचा मोठ्या फरकाने जिंकला आहे. दुसरीकडे टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये फायनलमध्ये जाण्यासाठी चढाओढ लागू शकते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com