Ind vs NZ Test: 1996 नंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडला इतिहास; सरफराज खानने केला कारनामा

Sarfaraz Khan IND vs NZ: बेंगळुरू कसोटी सामन्यात न्युझीलंडविरुद्ध सरफराज खानने शतक झळकावत सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. सरफराजने शानदार खेळी करत १५० धावा केल्या. ही खेळी करत त्याने आपल्या नावावर एक विक्रम नोंदवलाय.
Sarfaraz Khan
Sarfaraz Khan
Published On

बेंगळुरू कसोटीत न्युझीलंडविरुद्ध टीम इंडियाने शानदार खेळ केला. रोहित आणि कोहलीनंतर सरफराज खान आणि ऋषभ पंतने मैदानात धावांचा पाऊस पाडला. पंत एका धावेमुळे आपल्या शतकपासून दूर राहिला . तर सरफराज खानने १५० धावा करत अनेकांच्या लक्ष वेधून घेतलं. सरफराजने आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिलं कसोटी शतक पूर्ण केलं. दरम्यान सरफराजने या धावा करत भारतीय क्रिकेट इतिहासात नवा कारनामा केलाय. असाच कारनामा १९९६ मध्ये घडला होता.

सरफराजने केला मोठा कारनामा

अशी कामगिरी करणारा सरफराज तिसरा भारतीय खेळाडू बनलाय. त्याने पहिल्या डावात शुन्यावर बाद झाल्यानंतर त्याने दुसऱ्या डावात १५० धावा केल्या. सरफराजआधी अशा अनोखा कारनामा नयन मोंगियाने १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धात केला होता. तर १९५३ मध्ये माधव आपटे यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या डावात डक ऑऊट झाल्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी नाबाद १६३ धावांची खेळी केली होती.

दरम्यान डावखुरा फलंदाज असलेला सरफराजने आपल्या खेळीत १८ चौके आणि तीन ३ षटकार मारलेत. सरफराजने फलंदाजीच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी सुरू केली होती. याच आक्रमक खेळीमुळे त्याने अवघ्या ४६ धावात अर्धशतक केलं. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सरफराजने ११०चेंडूमध्ये शतक केलं.

Sarfaraz Khan
Sachin Tendulkar reaction : सरफराजच्या शतकानंतर सचिन तेंडुलकरलाही राहावलं नाही!,युवा खेळाडूंमध्ये उत्साह भरवणारी पोस्ट!

सरफराज-पंतने शानदार खेळी करत टीम इंडियाने न्युझीलंड संघाने ३५६ धावांची आघाडी मोडून काढलीय. भारतीय संघाने धावांची आघाडी मोडून काढत मोठी धावसंख्या उभी केलीय. दरम्यान वर्ष १९८५ मध्ये इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३८० धावा करत मोठी आघाडी केली होती. ही आघाडी मोडून काढण्यात भारतीय संघाला अपयश आले होते.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीसह सरफराज खानने भारतीय डाव शानदारपणे हाताळला. कोहलीसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. कोहली बाद झाल्यानंतर सरफराजने ऋषभ पंतसह डाव सांभाळला.

Sarfaraz Khan
IPL सामना कुठून खेळू? रोहितच्या मनात चाललंय काय? प्रश्नोत्तराचा व्हिडिओ व्हायरल

पंत -सरफराजने शानदार फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी १७७ धावा जोडल्या. ऋषभ पंतनेही धमाल फलंदाजी करत १०५ चेंडूत ९९ धावांची दमदार खेळी केली. पंतने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ५ षटकार मारले. याआधी विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी करत ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com