IPL सामना कुठून खेळू? रोहितच्या मनात चाललंय काय? प्रश्नोत्तराचा व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आयपीएलमध्ये रोहित शर्मा कोणाकडून खेळणार याबाबत एक सुचक संकेत दिलेत.
IPL सामना कुठून खेळू? रोहितच्या मनात चाललंय काय? प्रश्नोत्तराचा व्हिडिओ व्हायरल
Rohit Sharma Viral Video:
Published On

भारतविरुद्ध न्युझीलंडच्या संघात कसोटी सामने खेळले जात आहेत. बेंगरुळच्या एम चिनास्वामी स्टेडियमवर हे सामने खेळले जात आहेत. आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगरुळुचं हे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे येथे आरसीबीचे चाहते असणारचं त्यांनी रोहित शर्माला थेट आरसीबीमध्ये खेळण्याची विनंती केली. त्यावर रोहितने दिलेलं उत्तर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

कसोटी सामन्याच्या सरावादरम्यान एका चाहत्याने रोहित शर्माला तो आयपीएलमध्ये कोणत्या संघाकडून खेळणार असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देतांना रोहितने सुचक संकेत दिलेत.

याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टेडियमवर असलेल्या एका चाहत्याने हिटमॅन रोहितला आयपीएलसंदर्भात एक प्रश्न केला. आयपीएलमध्ये रोहित शर्मा कोणत्या संघाकडून खेळणार, असा प्रश्न केला. त्यावेळी उत्तर देतांना म्हणाला, कोणत्या संघाकडून मी खेळलं पाहिजे, असा प्रश्न रोहित शर्मानेच केला. त्यावर चाहता म्हणाला 'दादा आरसीबीमध्ये या, 'लव्ह यू भाई'. रोहितच्या या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया येत आहेत. एक युझर म्हणाला मला वाटतं रोहित शर्मा आरसीबीमध्ये जातील. तर एकजण म्हणाला, जर असं झालं तर ही खूप मोठी उलटफेर असेल.

दरम्यान रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू आहे. मुंबई संघाचं नेतृत्त्व करतांना त्याने पाचवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलीय. दरम्यान आयपीएल २०२४ मध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिकला पांड्याला मुंबईचा कर्णधार बनवलं होतं. त्यामुळे काही खेळाडू नाराज झाले होते. आयपीएल २०२५ रिटेन्शनची यादी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचा संघ रोहित शर्माला रिटेन करू शकते. यंदा आयपीएलमध्ये नवा नियम लागू करण्यात आलाय. या नियमानुसार, एक संघ ६ खेळाडूंना रिटेशन करू शकतील.

न्यूझीलंडसमोर टार्गेट किती?

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेचा पहिला सामना बेंगरुळूमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया भक्कम स्थितीत आहे. ऋषभ पंतचं शतक जरी हुकलं असेल तरी त्याने चांगली खेळी केलीय. तर सरफराजने दीडशे धावा केल्यात. दुसऱ्या डावात भारताने न्यूझीलंडला १०७ धावांचं आव्हान दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com