Virat Kohli Wicket: अंदाज चुकला, फटका फसला! Fulltoss बॉलवर अशी पडली विराटची विकेट - VIDEO

India vs New Zealand 2nd Test: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात विराट कोहली स्वस्तात माघारी परतला.
Virat Kohli Wicket: अंदाज चुकला, फटका फसला! Fulltoss बॉलवर अशी पडली विराटची विकेट - VIDEO
virat kohlitwitter
Published On

Virat Kohli Wicket: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी (२४ ऑक्टोबर) वॉशिंग्टन सुंदरने ७ गडी बाद केले.

यासह न्यूझीलंडचा संपूर्ण डाव अवघ्या २५९ धावांवर आटोपला. मात्र दुसऱ्या ( २५ ऑक्टोबर) दिवशी भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. तासाभरातच भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले आहेत.

न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला. भारतीय संघाला पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला. रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला. भारताला पहिल्या दिवशी १६ धावा करता आल्या.

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले. शुभमन गिल ३० धावांवर माघारी परतला. गिल पाठोपाठ विराट कोहलीही बाद होऊन माघारी परतला. तासाभरत भारताला २ मोठे धक्के बसले.

Virat Kohli Wicket: अंदाज चुकला, फटका फसला! Fulltoss बॉलवर अशी पडली विराटची विकेट - VIDEO
IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

विराट फुलटॉस चेंडूवर बाद

तर झाले असे की, विराट कोहलीची फलंदाजी सुरु असताना मिचेल सँटनर गोलंदाजीला आला. या षटकातील सुरुवातीचे ३ चेंडू विराटने खेळून काढले. मात्र षटकातील चौथा चेंडू विराटला कळालाच नाही. डिफेन्सिव्ह मोडमध्ये असलेल्या विराटला सँटनरने फुलटॉस चेंडू टाकला. या चेंडूवर विराट गोधंळला. त्याने ऑन साईडला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू यष्टीला जाऊन धडकला.

Virat Kohli Wicket: अंदाज चुकला, फटका फसला! Fulltoss बॉलवर अशी पडली विराटची विकेट - VIDEO
IND vs NZ: 7 विकेट्स घेताच वॉशिंग्टन सुंदरने रचला इतिहास! दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

न्यूझीलंडने केल्या २५९ धावा

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीला आलेल्या डेव्होन कॉन्व्हेने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तर रचिन रविंद्रने ६५ धावा केल्या. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ७ गडी बाद केले. न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com