IND Vs NZ 2nd Test: चेंडू समजण्याआधीच उडाला 'हिटमॅन'चा त्रिफळा; रोहित शर्मा चौथ्यांदा बनला साउदीचा शिकार

Rohit Sharma Duck: पुणे कसोटी सामन्यात रोहित शर्मा चांगली खेळी खेळण्यास अपयशी ठरला. पुन्हा एकदा टिम साऊदीने हिटमॅनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चेंडूने हवेत स्विंग होणारा चेंडू पाहून भारतीय कर्णधार गोंधळून गेला होता.
IND Vs NZ  2nd Test: चेंडू समजण्याआधीच उडाला 'हिटमॅन'चा त्रिफळा; रोहित शर्मा चौथ्यांदा बनला साउदीचा शिकार
Rohit Sharma
Published On

बेंगळुरुच्या कसोटीमध्ये ज्या प्रमाणे रोहित शर्मा बाद झाला त्याचप्रमाणे तो पुणे कसोटीत बाद झाला.चेंडू हवेत स्विंग करत साउदीने रोहितचा त्रिफळा उडवला. रोहितला काही कळण्याआधीच त्यांची दांडी गूल झाली होती.

बेंगळुरूप्रमाणे या सामन्यातही रोहित शर्मा शुन्य धावांवर बाद झाला. साउदीने टाकलेल्या चेंडू रोहितला समजलाच नाही, न तो शुन्यावर बाद झाला. दरम्यान पहिल्या दिवशी न्युझीलंडच्या संघ २५९ धावांवर आटोपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने एक विकेट गमावत १६ धावा दिवसाअंती केल्या होत्या.

परत भोपळ्यावर बाद

न्युझीलंड संघाचा डाव २५९ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल हे सलामीसाठी आले. दरम्यान फलंदाजी करताना रोहित शर्मा थोडा गोंधळलेला दिसला. आठ चेंडूंचा सामना करूनही रोहितला एकही धाव काढता आली नाही. टिम साउदीच्या ओव्हरमध्ये रोहित बाद झाला. साउदीच्या ओव्हरमध्ये अखेरच्या चेंडूवर रोहितचा त्रिफळा उडाला.

हवेत स्विंग झालेला चेंडू पाहून रोहित पूर्णपणे गोंधळला होता. रोहितचे हावभाव पाहून तो साउदीचा चेंडू समजून घेण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसत होतं. हिटमॅन कसोटी मालिकेत दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे.

रोहितसाठी साऊदीची गोलंदाजी ठरली तापदायक

कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मासाठी टिम साउदीची गोलंदाजी तापदायक ठरलीय. क्रिकेटमधील सर्वात मोठ्या फॉर्मटमध्ये किवीच्या या गोलंदाजाने हिटमॅनला चौथ्यांदा तंबूत पाठवलंय. साधारण ८ डावांमध्ये रोहितने साउदीच्या १२६ चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याला फक्त ५१ धावा काढता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com