World Cup 2023: IND vs NED सामन्यापूर्वी संघात मोठा बदल! युवा खेळाडूची संघात एन्ट्री

India vs Netherland: भारत आणि नेदरलँड हे दोन्ही संघ रविवारी आमने सामने येणार आहेत.
India vs Netherland
India vs Netherlandsaam tv news
Published On

India vs Netherland Playing 11 Prediction:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. भारतीय संघ वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघासह दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.

भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना येत्या रविवारी नेदरलँडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यापूर्वी नेदरलँड संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

नेदरलँड संघात मोठा बदल..

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी नेदरलँड संघात मोठा बदल करण्यात आला आहे. नेदरलँड संघातील वेगवान गोलंदाज रेयान क्लेन पाठीच्या दुखण्यामुळे संघातून बाहेर पडला आहे.

त्याच्याऐवजी युवा खेळाडू नोआ क्रॉसला संघात स्थान दिलं गेलं आहे. तो रविवारी भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो.

नोआ क्रॉसला एक आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव आहे. आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यात त्याने नेदरलँड संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यावेळी त्याला फलंदाजी करताना ७ धावा करता आल्या होत्या.

तर दुखापतीमुळे संघाबाहेर झालेल्या रेयान क्लेनला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत एक सामना खेळण्याची संधी मिळाली. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ७ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ७ षटक गोलंदाजी केली. मात्र त्याला एकही गडी बाद करता आला नव्हता. (Latest sports updates)

India vs Netherland
World Cup Semi Final: मुंबई की कोलकाता? टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलचा सामना कुठे रंगणार? वाचा सविस्तर

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी असा आहे नेदरलँडचा संघ:

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ'डोड, बास डी लीडे, विक्रम सिंह, तेजा निदामानुरु, पॉल वॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रूलोफ वॅन डेर मेरवे, लोगान वॅन बीक, आर्यन दत्त, नोआ क्रॉस, वेस्ले बर्रेसी, साकिब ज़ुल्फिकार, शारिज अहमद, साइब्रांड एंगेलब्रेक्ट

India vs Netherland
Cricketer Retirement: वर्ल्डकप सुरु असतानाच टीम इंडियाच्या ३३ वर्षीय स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com