Cricketer Retirement: वर्ल्डकप सुरु असतानाच टीम इंडियाच्या ३३ वर्षीय स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती

Gurkeerat Singh Maan Retirement: वर्ल्डकप सुरु असताना स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
team india
team indiasaam tv news
Published On

Gurkeerat Singh Maan Announced Retirement:

भारतात सध्या वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे. ही स्पर्धा सुरु असतानाच भारताच्या स्टार क्रिकेटपटूने आतंरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. या ३३ वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडूने २०१६ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं.

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू गुरकीरत सिंग मानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली.

गुरकीरत सिंग मानने २०१६ मध्ये झालेल्या सीके नायडू ट्रॉफी स्पर्धेत दमदार खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याननंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेतील २०१५-१६ च्या हंगामात तुफान फटकेबाजी केली होती. या स्पर्धेत त्याने दुहेरी शतकही झळकावलं होतं. भारताच्या वनडे संघात पदार्पण करण्यापूर्वी त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याला या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. (Gurkeerat Singh Maan)

गुरकीरत सिंग मानने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स,पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांचं प्रतिनिधित्व केलं. त्याने ३३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम का ठोकला यामागचं कारण समजू शकलेलं नाही.

गुरकीरत सिंग मानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहीले की, 'माझ्या अविश्वसनिय क्रिकेट प्रवासाचा आज शेवटचा दिवस आहे. भारताचं प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. (Latest sports updates)

team india
PAK vs ENG: 'इंग्लंडला धुळ चारण्यासाठी आमचा मास्टरप्लान तयार..', महत्वाच्या सामन्यापूर्वी बाबर आझमने सांगितला खास प्लान

मला सपोर्ट करण्यासाठी मी माझे कुटुंब,प्रशिक्षक, मित्र आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानतो. माझ्या कारकिर्दीत तुम्ही महत्वाची भूमिका बजावली आहे.

team india
World Cup Semi Final: मुंबई की कोलकाता? टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलचा सामना कुठे रंगणार? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com