PAK vs ENG: 'इंग्लंडला धुळ चारण्यासाठी आमचा मास्टरप्लान तयार..', महत्वाच्या सामन्यापूर्वी बाबर आझमने सांगितला खास प्लान

Babar Azam Statement: पाकिस्तानच्या कर्णधाराने इंग्लंडला धुळ चारण्यासाठी खास प्लान सांगितला आहे.
babar azam
babar azamtwitter
Published On

Babar Azam Reveals The Plan Before Match Against England:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जनतेस तीन संघ ठरले आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंडचं तिकीटही जवळजवळ कन्फर्म झालं आहे. मात्र न्यूझियलंडला नेट रन रेटमध्ये मागे सोडून अजूनही

पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करू शकतो. सेमीफायनल गाठणं कठीण असलं तरीदेखील बाबर आझमने विश्वास व्यक्त करत खास प्लान सांगितला आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बाबर आझम म्हणाला की, ' आमच्याकडे नेट रन रेटसाठी खास प्लान आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' आमच्याकडे नेट रन रेटसाठी खास प्लान आहे. आम्ही त्यावर काम करू. आमची रणनीती तयार आहे, सुरुवातीचे १० षटक काय करायचं त्यानंतर काय करायचं. फखर जमानने २०-३० षटकं खेळून काढली तर आम्ही आमचं लक्ष्य गाठू शकतो. या सामन्यात इफ्तिकार अहमद आणि मोहम्मद रिजवानची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. (Latest sports updates)

babar azam
World Cup 2023: लंकेच्या पराभवामुळे न्यूझीलंडच्या संघासाठी सेमिफायनलचे दरवाजे उघडले

पाकिस्तानचा संघ सध्या ८ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानचं सेमीफायनल गाठणं सोपं नसणार आहे. कारण पाकिस्तानने जर प्रथम गोलंदाजी केली तर इंग्लंडला ५० धावांवर थांबवावं लागेल. हे आव्हान पाकिस्तानला अवघ्या दोन षटकात पूर्ण करावं लागेल. तर पाकिस्तानचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरू शकतो. तर धावांचा बचाव करताना पाकिस्तानला २८७ धावांपेक्षा अधिक धावांनी विजय मिळवावा लागणार आहे.

babar azam
World Cup Semi Final: मुंबई की कोलकाता? टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलचा सामना कुठे रंगणार? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com