Ind Vs Eng : सेमिफायनलआधी रोहित शर्माची भीतीनं उडाली होती झोप, टॉसनंतर स्वतःच सांगितलं कारण

भारत-इंग्लंड यांच्यातील सेमिफायनलआधी रोहित शर्मा प्रचंड घाबरला होता. त्याचं कारण आता स्वतःच सांगितलं आहे.
Ind Vs Eng, Rohit Sharma/file
Ind Vs Eng, Rohit Sharma/filesaam tv
Published On

Ind Vs Eng Semifinal : भारत आणि इंग्लंड यांच्यात टी २० वर्ल्डकपमधील सेमिफायनलचा हायव्होल्टेज सामना सुरू आहे. इंग्लंडने टॉस जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं आहे. कर्णधार रोहित शर्मा सुद्धा प्रथम फलंदाजी करण्यास इच्छुक होता. टॉसच्या वेळी त्यानं सांगितलं की, सेमिफायनलच्या आधी त्याला कशाची भीती वाटत होती?

रोहित शर्मानं (Rohit Sharma) टॉस जिंकला नसला तरी, त्यानं सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आहोत. हा सामना शेवटपर्यंत घेऊन जाणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. आम्ही इंग्लंडसोबत अलीकडच्या काही वर्षांत खूप सामने खेळलो आहोत. त्यांची ताकद आणि कमजोरी आम्हाला ठाऊक आहे, असं रोहित शर्मा म्हणाला.

Ind Vs Eng, Rohit Sharma/file
India Vs England Semi Final Live: 'जॉस द बॉस', इंग्लंडच्या सलामीवीरांचा भारतावर एकतर्फी विजय

रोहित म्हणाला की, शांत राहून जे आम्हाला करायचे आहे ते करणार आहोत. हे आमच्यासाठी खूपच महत्वाचे आहे. सेमिफायनलच्या आधी मला एका गोष्टीची खूप भीती वाटली होती. त्याला दुखापतीविषयी विचारणा केली होती. नेट सरावाच्या वेळी त्याला दुखापत झाली होती. त्यावर रोहित शर्मा म्हणाला की, दुखापत भीतीदायक होती. मात्र, आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. आमच्याकडे ज्या प्रकारचे टॅलेंट आहे, ते बघितले तर प्लेइंग इलेव्हनची निवड कठीण होती. मात्र, आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही.

Ind Vs Eng, Rohit Sharma/file
IND vs Aus : टीम इंडियाचं कुठे चुकलं? रोहित शर्मा स्पष्टच बोलला

सरावावेळी रोहितला दुखापत

दरम्यान, नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना चेंडू लागून रोहित शर्माला दुखापत झाली होती. रोहित शर्मालाच दुखापत झाल्याने सर्वच हादरले होते. ४० मिनिटे रोहित शर्मा सराव सत्रात नव्हता. सेमिफायनलसारख्या महत्वाच्या सामन्याआधीच दुखापत झाल्याने स्वतः रोहित शर्मा घाबरला होता. मात्र, काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा तो सराव सत्रात सहभागी झाला होता. (Cricket News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com