India Vs England Semi Final Live: 'जॉस द बॉस', इंग्लंडच्या सलामीवीरांचा भारतावर एकतर्फी विजय

अॅडलेडच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनलचा महामुकाबला, पाह लाईव्ह अपडेट्स
India vs England
India vs Englandsaam tv

इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय, बटलर-हेल्सचं नाबाद अर्धशतक

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 वर्ल्डकपचा सेमीफायनलचा महामुकाबला अॅडलेडच्या मैदानात रंगला. भारतानं इंग्लंडला 169 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर कर्णधार जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्सनं भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सलामी जोडीनं नाबाद अर्धशतकी खेळी करून भारतावर एकतर्फी विजय मिळवला. जॉस बटलरने 49 चेंडूत 80 तर अॅलेक्स हेल्सने 47 चेंडूत 86 धावा कुटल्या. दोघांच्या दमदार नाबाद खेळीमुळं भारताचा दारुण पराभव झाला. इंग्लंडने 16 षटकात 170 धावांची खेळी साकारून भारताचा पराभव केला.

जॉस बटलर-अॅलेक्स हेल्सची शतकी भागिदारी, इंग्लंड 154-0

इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने शतकी भागिदारी रचून इंग्लंडची विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. भारतीय गोलंदाजांवर आक्रमक खेळी करून बटलर-हेल्सने मैदानात धावांचा पाऊस पाडला.

बटलर-हेल्सची चौफेर फटकेबाजी, 12 षटकानंतर इंग्लंड 123-0

भारतानं दिलेलं 169 धावांचं टार्गेट गाठण्यासाठी उतरलेल्या सलामीवीर जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने भारतीय गोलंदाजांवर पॉवर प्ले मध्ये चौफेर फटकेबाजी केली. भारतीय गोलंदाजांना अद्यापही विकेट्सचा सूर गवसला नाहीय. त्यामुळे ,सहा षटकानंतर इंग्लंड बिनबाद 63 धावांवर पोहोचला. रवीचंद्रन आश्विनने टाकलेल्या सातव्या षटकात इंग्लंडच्या फलंदाजांनी मोठे फटके मारले. त्यामुळं इंग्लंडची धावसंख्या बिनबाद 75 वर पोहोचली. त्यानंतर आठव्या, नवव्या आणि दहाव्या षटकातही इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांची गती कायम ठेवली.

सलामीवीर बटलर-हेल्स मैदानात, पाच षटकानंतर इंग्लंड 52-0

भारतानं दिलेलं 169 धावांचं टार्गेट गाठण्यासाठी इंग्लंडचे सलामीवीर जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स मैदानात उतरले आहेत. पहिल्या षटकात तीन चौकार ठोकून जॉस बटलरने इंग्लंंडला दमदार सुरुवात करून दिली. भारताचा वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार पहिल्या षटकात काहिसा महागडा ठरला. अर्शदीप सिंगने टाकलेल्या दुसऱ्या षटकात 8 धावा दिल्या. भूवनेश्वरच्या तिसऱ्या षटकात अॅलेक्स हेल्सेने षटकार-चौकार ठोकून धावसंख्या वाढवली.

भारताचं इंग्लंडला 169 धावांचं टार्गेट, विराट-हार्दिक चमकला

अॅडलेडच्या मैदानात सुरू असलेल्या भारत-इंग्लंडच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतानं वीस षटकात 168 धावा केल्या. त्यामुळं इंग्लंडला भारतानं 169 धावांचं आव्हान दिलं आहे. के एल राहुल, कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्यानं चौफेर फटकेबाजी करून दमदार अर्धशतक ठोकलं. विराटने 40 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने 33 चेंडूत 63 धावा कुटल्या. रोहित शर्माने 27, सूर्यकुमार यादव 14 तर रिषभ पंत 6 धावांवर बाद झाला.

विराट कोहली अर्धशतक ठोकून झेलबाद, 20 षटकानंतर भारत 168-6

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने विराट कोहलीला 50 धावांवर झेलबाद केलं. सेमीफायनलच्या सामन्यातही कोहलीने 'विराट' खेळी करून भारताच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. विराटने 40 चेंडूत 50 धावा कुटल्या. विराट बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने गिअर बदलून 29 चेंडूत अर्धशतक ठोकलं.

रशिदच्या फिरकीवर सूर्यकुमार बाद, 18  षटकानंतर भारत 136-4

तेरा षटकानंतर भारताची धावसंख्या तीन बाद 80 वर पोहोचली. बाराव्या षटकात इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशिनने सूर्यकुमार यादवला 14 धावांवर झेलबाद केलं. विराट कोहली आणि हार्दिक पंड्या भारताची पारी सांभाळत असून धावसंख्येची गती वाढवत आहेत. चौदाव्या षटकानंतर भारताची धावसंख्या 90-3 अशी आहे. पंधरा षटकानंतर भारताने शंभरी गाठली असून विराट-हार्दिकवर भारताची मदार होती. सोळा षटकानंतर भारताची धावसंख्या तीन बाद 110 वर पोहोचली. त्यानंतर सतराव्या षटकात हार्दिकने सॅम करनला षटकार ठोकून भारताची धावसंख्या वाढवली.

ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर रोहित बाद, भारत 11षटकानंतर 74-2

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने नवव्या षटकात भारताला दुसरा धक्का दिला. कर्णधार रोहित शर्मा 28 चेंडूत 27 धावांवर झेलबाद झाला. विराट कोहली-सूर्यकुमार भारताची कमान सांभाळत असून सावध खेळी करत आहेत. दहा षटकानंतर भारताची धावसंख्या 62-2 अशी झाली आहे. अकराव्या षटकात सूर्यकुमार यादवने गिअर बदलला. चौकार षटकार ठोकून भारताची धावसंख्या वाढवली. अकरा षटकानंतर भारताची धावसंख्या 74-2 झाली आहे.

रोहित-विराटची सावध खेळी, आठ षटकानंतर भारत 51-1

पॉवर प्ले मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने के एल राहुलला पाच धावांवर झेलबाद करून भारताला दुसऱ्या षटकात पहिला धक्का दिला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं पारी सांभाळली. दोघांनी सावध खेळी केल्यामुळं भारत सहा षटकानंतर 38-1 वर पोहोचला. सातव्या आणि आठव्या षटकात भारताच्या धावसंख्येत वाढ होऊन 51-1 अशी झाली.

भारताला पहिला धक्का, राहुल तंबूत, पाच षटकानंतर भारत 31-1

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने भारताला पहिला धक्का दिला. वोक्सच्या उसळत्या चेंडूवर राहुल 5 धावा करून झेलबाद झाला. रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताची कमान सांभाळत असून सावध खेळी करत आहेत. तीन षटकानंतर भारत एक बाद 11 धावांवर पोहोचला. चौथ्या षटकात भारताला अवघ्या तीन धावा मिळाल्याने धावसंख्या 21-1 अशी झाली. पाचव्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने दोन चौकार ठोकले. त्यामुळे भारताच्या धावसंख्येत वाढ झाली. पाच षटकानंतर भारताची धावसंख्या 31-1 अशी आहे.

सलामीवीर रोहित-राहुल मैदानात, पहिल्या षटकानंतर भारत 6-0

भारताचे सलामीवीर फलंदाज के एल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बेन स्टोकने पहिलं षटक फेकलं. पहिल्याच चेंडूवर राहुलने चौकार मारत भारताची दमदार सुरुवात केली. त्यामुळे पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या 6-0 अशी आहे.

ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपचा थरार सुरु असून आज अॅडलेडच्या मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात सेमीफायनलचा महामुकाबला होणार आहे. भारताने सुपर 12 मधील ग्रुप दोन मध्ये आठ गुणांची मजल मारत अव्वल स्थान गाठलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने बलाढ्य न्यूझीलंडचा पराभव करत फायनमध्ये प्रवेश केला आहे. 2007 च्या वर्ल्डकपची पुनरावृत्ती होऊन भारत-पाकिस्तान फायनल मध्ये आमने-सामने येणार का? याकडे जगभरातील क्रिडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.

मात्र, आज होणाऱ्या भारत-इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलच्या सामन्यानंतरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. झिम्बाब्वे विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा संघ आजच्या सामन्यातही कायम असणार आहे. दिनेश कार्तिकच्या जागेवर रिषभ पंत खेळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com