IND vs ENG : पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा धमाकेदार विजय; हार्दिक पांड्या चमकला

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेला विजयाने सुरुवात केली.
IND vs ENG T-20 Match, IND vs ENG 1st T20 Highlights, Hardik Pandey, Hardik Pandey News, Hardik Pandey T20 Score
IND vs ENG T-20 Match, IND vs ENG 1st T20 Highlights, Hardik Pandey, Hardik Pandey News, Hardik Pandey T20 ScoreSaam Tv

नवी दिल्ली : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेला विजयाने सुरुवात केली. साउथॅम्प्टन येथील रोझ बाउल स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 50 धावांनी धुव्वा उडवून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 198 धावा केल्या, त्यानंतर इंग्लंडचा संघ 19.3 षटकांत 148 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात विजय मिळवताच रोहित शर्मा T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सलग 13 विजय नोंदवणारा पहिला कर्णधार बनला. (IND vs ENG T20 Latest News)

IND vs ENG T-20 Match, IND vs ENG 1st T20 Highlights, Hardik Pandey, Hardik Pandey News, Hardik Pandey T20 Score
IND vs ENG : पहिल्याच टी-20 सामन्यात अर्शदीपची उत्कृष्ट कामगिरी; तरीही उर्वरीत सामन्यात मिळणार नाही संधी!

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने चमकदार कामगिरी केली. हार्दिकने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये योगदान देत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रोवला. हार्दिक टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अर्धशतक आणि 4 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला. त्याने 51 धावांचे योगदान दिले आणि 4 बळीही घेतले. हार्दिकने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. डेव्हिड मलान आणि लियम लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवल्यानंतर त्याने जेसन रॉय आणि सॅम करनलाही माघारी पाठवलं.

199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने वारंवार अंतराने विकेट गमावल्या. यजमान संघाकडून मोईन अलीने सर्वाधिक 36 धावा केल्या. त्याने हॅरी ब्रूक (28) सोबत 5 व्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. मोईनने 20 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. तर हॅरीने 23 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा केल्या. (Hardik Pandey T20 Score)

IND vs ENG T-20 Match, IND vs ENG 1st T20 Highlights, Hardik Pandey, Hardik Pandey News, Hardik Pandey T20 Score
.....म्हणून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीचं नाव नाही

ख्रिस जॉर्डन 17 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 26 धावा काढून नाबाद परतला. हार्दिक व्यतिरिक्त युझवेंद्र चहलने 2 विकेट घेतल्या तर पदार्पण सामना खेळणारा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 2 बळी घेतले. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी 1-1 बळी टिपले.

तत्पूर्वी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकांत 198 धावा केल्या. अष्टपैलू हार्दिक पांड्याने सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले. हार्दिकने 33 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याच्याशिवाय सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 39 धावा आणि दीपक हुड्डाने 15 चेंडूत 37 धावांची तुफानी खेळी केली. (IND vs ENG T20 Highlights)

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com