
नवी दिल्ली : टीम इंडिया (Indian Cricket Team) इंग्लंड विरुद्ध टी-२० आणि वन डे सीरिज खेळत आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वन डे सीरिजसाठी (West indies one day Series) भारताच्या संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. दरम्यान, भारताचा अनुभवी आक्रमक फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व करणार आहे. दरम्यान, एका रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने (virat Kohli) या सीरिजसाठी स्वत:च विश्रांती घेण्यासाठी सांगितलं होतं.
क्रिकबझने दिलेल्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीने स्वत:च बीसीसीआई, टीम मॅनेजमेंट आणि सिलेक्टर्सला वेस्ट इंडिजच्या विरुद्ध होणाऱ्या सीरिजमध्ये त्याचं नाव न देण्यासाठी सांगितलं होतं. भारताच्या कोणत्या खेळाडूंनी विश्रांती मागितली होती,याबाबत बीसीसीआईने अधिकृत माहिती दिली नाहीय. आगामी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारताचा सुरु असलेला इंग्लंड दौरा आणि पुढे होणारा वेस्ट इंडिज दौरा महत्वाचा ठरणार आहे. या विश्वचषकात विराट कोहलीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. पण विराट कोहली अनेकदा विश्रांती घेत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विराटने पुन्हा एकदा मैदानात त्याच्या आक्रमक अंदाजात फलंदाजी करून धावांचा पाऊस पाडावा, अशी अपेक्षा त्याचे चाहते व्यक्त करीत आहेत.
आयपीलनंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही विराटने विश्रांती घेतली होती. तसेच आर्यलॅंडच्या विरोधात झालेल्या सामन्यांतही सर्व वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर होते. इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० मध्ये विराट खेळणार नाहीय. आता वेस्टइंडिज विरोधात होणाऱ्या वनेड सीरिजसाठीही तो संघातून बाहेर आहे. तसंच टी-२० सीरिजमध्येही तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या वन डे टीमची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. शिखर धवनकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली असून रविंद्र जडेजा उपकर्णधार असणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे सीरिजसाठी रोहित शर्मा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, विराट कोहली, के एल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे.
'भारत- वेस्ट इंडिज' वन डे सीरिज
२२ जुलै - पहिला एकदिवसीय सामना
२४ जुलै - दुसरा एकदिवसीय सामना
२७ जुलै - तिसरा एकदिवसीय सामना
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.