
मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवार म्हणजेच आजपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिली लढत साउथम्प्टन येथील रोझ बाउल मैदानात खेळवण्यात येईल. रोहित शर्मा तंदुरुस्त असून, भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. रोहितशिवाय इतर तीन फलंदाज सलामीला येऊ शकतात. रोहित शर्मा याच्यासोबत सलामीला कोण येऊ शकतं? प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याबाबत जाणून घेऊयात. (India vs England T 20 Rohit Sharma Team India Playing XI)
पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) सलामीला येणार हे निश्चित आहे. तसेच आणखी तीन फलंदाज आहेत, ज्यांनी अलीकडेच अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत दमदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात अनेक युवा क्रिकेटपटूंना संघात संधी दिली असून, त्यातील काहींनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाची (Team India) प्लेइंग इलेव्हन निवडण्याचं आव्हान रोहित शर्मासमोर असणार आहे.
ऋतुराज गायकवाड, इशान किशनपैकी एकालाच संधी
ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन हे दोन दावेदार मानले जातात. या दोघांपैकी एकच रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकतो. इशान किशन हा रोहित शर्मासोबत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सलामीला येतात. तो डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. आयर्लंडविरुद्ध दोन्ही टी-२० सामन्यांत इशानला खास कामगिरी करता आली नव्हती. तर गायकवाडलाही संधी मिळू शकली नव्हती. (Cricket News)
संजू सॅमसनही शर्यतीत
संजू सॅमसन हा आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत सलामीला आला होता. पहिल्या लढतीत त्याला खातंही उघडता आलं नव्हतं. तर दुसऱ्या लढतीत त्याने ४२ चेंडूंमध्ये ७७ धावा केल्या होत्या.
दीपक हुडाला पुन्हा संधी मिळणार?
दीपक हुडा हा आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत नाबाद आणि दुसऱ्या लढतीत शतक ठोकलं होतं. त्यानंतर डर्बीशायरविरुद्धच्या सराव सामन्यातही त्याने ५९ धावांची खेळी केली होती. आयपीएल २०२२ पासून तो जबरदस्त फॉर्मात आहे.
उमरान मलिकला संघात स्थान
रोहित शर्माने यापूर्वीच सांगितले आहे की, आयर्लंडविरुद्धच्या टी २० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा उमरान मलिक हा संघाचा भाग असेल. उमरानला त्याची जबाबदारी काय असेल हे सांगितले आहे. संघाला त्याच्याकडून कशा प्रकारची कामगिरी अपेक्षित आहे, हे देखील त्याला सांगितले आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, उमरान मलिक.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.