IND vs ENG: इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय! शमीला डच्चू, या 3 खेळाडूंचं संघात कमबॅक; पाहा प्लेइंग ११
team indiatwitter

IND vs ENG: इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय! शमीला डच्चू, या 3 खेळाडूंचं संघात कमबॅक; पाहा प्लेइंग ११

Team India Playing XI, IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
Published on

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेटच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने पहिल्यांदाच नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान या सामन्यासाठी कशी आहे भारतीय संघाची प्लइंग ११? जाणून घ्या.

IND vs ENG: इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय! शमीला डच्चू, या 3 खेळाडूंचं संघात कमबॅक; पाहा प्लेइंग ११
IND vs ENG: निर्णायक सामन्यात भारताची प्लेइंग ११ बदलणार? अर्शदीपचं कमबॅक, या गोलंदाजाची होणार सुट्टी

अर्शदीप सिंगचं कमबॅक

या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मालिका जिंकायची असेल तर भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

या सामन्यात अर्शदीप सिंगला संधी दिली गेली आहे. तर मोहम्मद शमीला विश्रांती दिली गेली आहे. तर ध्रुव जुरेलच्या जागी रिंकू सिंगचा संघात समावेश केला गेला असून, वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शिवम दुबेला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली आहे.

IND vs ENG: इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय! शमीला डच्चू, या 3 खेळाडूंचं संघात कमबॅक; पाहा प्लेइंग ११
Ind vs Eng T 20 Match: भारत-इंग्लंड टी-२० मॅचवर GBS चं सावट, कशी घेणार खबरदारी? वाचा

भारतीय संघासह इंग्लंडच्या प्लेइंग ११ मध्ये देखील २ मोठे बदल करण्यात आले आहेत. या सामन्यातून मार्क वूडला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याच्या जागी साकीब महमूदला संधी दिली गेली आहे.

तर स्मिथच्या जागी जेकब बेथलला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली आहे. इंग्लंडने गेल्या सामन्यात दमदार कामगिरी केली होती. तिसरा सामना जिंकून इंग्लंडने २-१ ने मालिकेत कमबॅक केलं. तर हा सामना जिंकून इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

IND vs ENG: इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय! शमीला डच्चू, या 3 खेळाडूंचं संघात कमबॅक; पाहा प्लेइंग ११
IND vs ENG, Weather Prediction: पुण्यात धावांचा पाऊस पडणार की गोलंदाजांची चांदी होणार? खेळपट्टी कोणाला देणार साथ?

भारत (Playing XI): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (Playing XI): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बॅथेल, जेमी ओव्हर्टन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com