राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने एक विक्रम केलाय. कसोटी क्रिकेट करिअरमध्ये अश्विनने ५०० विकेट घेण्याचा मान मिळवलाय. कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम केल्यानंतर भारतीय संघात आनंदाचं वातावरण होतं. परंतु कसोटी सामना खेळत असलेल्या भारतीय संघातून अश्विनने माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.(Latest News)
अश्विनने संघातून माघार का घेतली असा प्रश्न केला जात आहे. दरम्यान अश्विनने चालू सामन्याच्या दरम्यान संघातून माघार का घेतली याचं कारण बीबीसीआयने एक्स या सोशल मीडिया साइटवर सांगितलं आहे. BCCI ने यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, अश्विनच्या घरात वैद्यकीय इमर्जन्सी आल्याने त्याला कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागलीय. अशा कठीण आणि आव्हात्मक वेळी भारतीय क्रिकेट मंडळ आणि संघच्या पाठीशी आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बीसीसीआयने चॅम्पियन क्रिकेटर आणि त्याच्या कुटुंबाला आपला पाठिंबा दिला. खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य उत्तम राहण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अश्विन आणि त्याचे कुटुंब या कठीण काळातून जात असल्याने त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा अशी क्रिकेट मंडळाने विनंती केलीय.
अश्विनच्या आईची प्रकृती खालावल्याने त्याला कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे. अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली. 'मी त्याच्या आईला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. त्याला राजकोट कसोटी सोडून आईसोबत राहण्यासाठी चेन्नईला जावे लागले, असं राजीव शुक्ला आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.