भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या डावात इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रुट अवघ्या २९ धावा करत माघारी परतला. या खेळीसह त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने मोठ्या रेकॉर्डमध्ये सचिन तेंडुलकरलाही मागे सोडलं आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावे होता.सचिनने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना ३२ कसोटी सामन्यांमध्ये २५३५ धावा केल्या होत्या.
यादरम्यान त्याने ७ शतक आणि १३ अर्धशतकं झळकावली होती. या रेकॉर्डमध्ये सचिनला मागे सोडत जो रुट अव्वल स्थानी पोहोचला आहे. जो रुटने ४६ कसोटी सामन्यांमध्ये २५५५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ९ शतक आणि १० अर्धशतक झळकावले आहेत. २१८ ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे. (Latest sports update)
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत. सुनील गावसकर यांनी इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या ३८ सामन्यांमध्ये २४८३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी ४ शतकं आणि १६ अर्धशतकं झळकावली आहेत.
तर इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक या यादीत चौथ्या स्थानी आहे. अॅलिस्टर कुकने ३० सामन्यांमध्ये २४३१ धावा केल्या आहेत. विराट कोहली या यादीत पाचव्या स्थानी आहे. विराटने २८ सामन्यांमध्ये १९९१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ शतक आणि ९ अर्धशतक झळकावले आहेत.
भारतीय संघाविरुद्ध असा कारनामा करणारा पहिलाच फलंदाज..
भारतीय संघाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही जो रुट संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहे. रिकी पॉटींग आणि जो रुट यांनी भारतीय संघाविरुद्ध कसोटीत फलंदाजी करताना २६ सामन्यांमध्ये २५५५ धावा केल्या आहेत. या यादीत इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक दुसऱ्या स्थानी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.