IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाच्या पराभवांच्या मालिकेचा अखेर अंत झाला आहे. आयर्लंडविरुद्ध दोन आणि इंग्लंडविरुद्ध चार टी-२० सामन्यांत पराभव पत्करल्यानंतर, संघाने अखेर विजय मिळवला.
IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला  पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय
Published On

रोहित शर्मा, विराट कोहली कमी धावांमध्ये बाद झालेत. दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर चांगली खेळी करणारा शुबमन गिलही रिटायर्ड हर्ट झाला. यामुळे भारतीय चाहत्यांना पराभवाची भीती सतावत होती. टी२० मालिकेनंतर भारतीय संघाला पहिल्या एकदिवशीय सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागेल का असं वाटत होतं. परंतु अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या चिकट फलंदाजीनं भारताला पहिला विजय मिळवून दिला.

एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २५८ धावा केल्या आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघाने चार गडी गमावून हे लक्ष्य गाठले. कर्णधार शुभमन गिल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताने २५९ धावांचे लक्ष्य ४५.२ षटकांत पूर्ण केले. कर्णधार शुबमन गिलने अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या साथीने सामन्यात शानदार कामगिरी केली.

टी-२० मालिका संपल्यानंतर आता इंग्लंड आणि भारतीय संघ यांच्यात एकदिवसीय मालिकेसाठी आमनेसामने आलेत. या मालिकेतील पहिला सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजीची सुरुवात चांगली केली. दोघांनी सलामीला ४३ धावांची भागीदारी केली. रोहितने २१ चेंडूंत ११ धावा (एका चौकारासह) केल्या, मात्र आठव्या षटकात सॅम करनने त्याला बाद केले. विराट कोहलीलाही (६ चेंडूंत ५ धावा) मोठी खेळी करता आली नाही.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला  पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय
Shubman Gill: 2027 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार का? कर्णधार शुभमन गिलने एका वाक्यात दिलं उत्तर

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. भारतासमोर विजयासाठी २५९ धावांचे लक्ष्य होते. रोहित आणि कोहली यांनी मोठी खेळी करून संघाला भक्कम सुरुवात करून द्यावी, अशी चाहत्यांची अपेक्षा होती, मात्र हे दोघेही स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले.

डावाची सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माला सुरुवातीपासूनच फलंदाजी करताना दबावात वाटत होता. त्याने २१ चेंडूंत केवळ ११ धावा केल्या. यात एका चौकाराचा समावेश होता. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करनने आठव्या षटकात त्याची विकेट घेतली. विराट कोहलीलाही सूर गवसला नाही. नवव्या षटकात जोफ्रा आर्चरने त्याला 'एलबीडब्ल्यू' (LBW) करत बाद केले. रोहित आणि विराट अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतले.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला  पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय
टीम इंडियाचा लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय; क्रांतीच्या पंचने इंग्लंडचा धुव्वा

डावाच्या सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर कर्णधार गिलने श्रेयस अय्यरच्या साथीने डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. २६ व्या षटकात गिल दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. मात्र त्याने ७५ चेंडूंत ८० धावा केल्या होत्या,यात ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

अय्यर ५३ चेंडूंत ३५ धावा केल्या. तो २७ व्या षटकात धावबाद झाला. २८ व्या षटकात जोश टंगने के.एल. राहुलला एका धावेवर त्रिफळाचीत केलं. अशा कठीण परिस्थितीत अक्षर आणि सुंदर यांनी अर्धशतकी भागीदारी रचत भारताला विजयापर्यंत नेले. अक्षरने ५२ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५७ धावा केल्या. सुंदरने ६३ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५२ धावांचे योगदान दिले. या जोडीने १०२ धावांची अभेद्य भागीदारी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com