Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप
suryakumar yadavtwitter

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप

India vs Bangladesh 1st T20I, Suryakumar Yadav Record: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नावावर मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
Published on

Suryakumar Yadav Record News In Marathi: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार सूर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करत १४ चेंडूत २९ धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो या फॉरमॅटमध्ये किती आक्रमक फलंदाज आहे, याची झलक त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच पाहायला मिळाली होती.

त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला होता. आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने जोस बटलरला मागे सोडलं आहे.

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप
IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा अव्वल स्थानी आहे. रोहितच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये २०५ षटकार मारण्याची नोंद आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Suryakumar Yadav: सूर्या भाऊ रॉक्स! मोठ्या रेकॉर्डमध्ये बटलरला सोडलं मागे; रोहित ऑन टॉप
IND vs BAN: सूर्याचा मास्टरप्लान! पहिल्या सामन्यात या दोघांना पदार्पणाची संधी; पाहा Playing XI

तर न्यूझीलंडचा स्टार फलंदाज मार्टीन गप्टील या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. गप्टीलने १७३ षटकार खेचले आहेत. वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४४ षटकार खेचले आहेत. आता सूर्यकुमार यादवने १३९ षटकार खेचले आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारे फलंदाज

  • रोहित शर्मा- २०५

  • मार्टीन गप्टील- १७३

  • निकोलस पूरन- १४४

  • सूर्यकुमार यादव -१३९

  • जोस बटलर -१३७

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com