आयपीएल २०२५ साठीचा मेगा लिलाव सध्या सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये सुरु आहे. हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. या मेगा लिलावात एकूण ५७७ खेळांडूवर बोली लागणार असून यामध्ये भारतातील स्टार खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंचा समावेश असणार आहे. आयपीएल लिलावाच्या सुरुवातीला पहिल्या मार्की खेळाडूंच्या यादीत सहा बड्या खेळांडूसाठी बोली लावण्यात आली. पहिल्या सेटमध्ये मिचेल स्टार्क, अर्शदीप सिंग,कागिसो रबाडा, श्रेयस अय्यर, जोस बटलर आणि रिषभ पंत यांसारख्या स्टार खेळांडूवर बोली लावण्यात आली.
एकिकडे पहिल्याच सेटमध्ये भारतीय खेळांडूवर पैशांचा वर्षाव करण्यात आला आहे. तर, दुससरीकडे स्टार विदेशी खेळांडूवर गेल्या हंगामापेक्षा पण कमी बोली लावण्यात आली. आतापर्यंत या लिलावात रिषभ पंतवर सगळ्यात मोठी बोली लावण्यात आली. त्याला २७ कोटींमध्ये लखनऊ सुपरजायंट्सने आपल्या संघात घेतले. तर ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क याला ११.७५ कोटींमध्ये दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे. आयपीएल २०२४ च्या लिलावात सर्वात जास्त २४.७५ कोटी मोजत कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या संघात घेतले होते. मात्र, यावेळी ५० टक्क्याहून कमी रक्कम मोजत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतले.
आयपीएल २०२४ चा सर्वात महाग खेळाडू मिचेल स्टार्कला यंदाच्या आयपीएल मेगा लिलावात मोठा झटका बसला आहे. आयपीएल २०२४ च्या लिलावात मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने २४.७५ कोटींची विक्रमी बोली लावत इतिहास रचला होता. या बोलीनंतर, सर्व क्रिकेटतज्ञ आणि क्रिकेट चाहत्यांचे लक्ष मिचेल स्टार्कवर होते. मिचेल स्टार्कवर संघासाठी उत्तम कामगिरी करण्याची जबाबदारी होती. परंतु संपूर्ण हंगामात अपेक्षाप्रमाणे कामगिरी दिसली नव्हती. मात्र, शेवटी त्याने कमबॅक करुन संघाला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आयपीएल २०२४च्या हंगामात, स्टार्कने १४ सामने खेळले होते. या सामन्यात १०.६१ इकॉनॉमी रेटने १७ विकेट्स घेतले होते.
कोलकाला नाइट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ ची ट्राफी जिंकली होती. मात्र, कोलकाताने श्रेयस अय्यर आणि मिचेल स्टार्क सारख्या बड्या खेळांडूना रिलीज केले होते. आयपीएल २०२५च्या मेगा लिलावात मिचेल स्टार्कला गेल्या हंगामापेक्षा ५० टक्क्याहून कमी रक्कम मिळाली.
मिचेल स्टार्कने २०१४ मध्ये रॅायल चॅलेंजर्स बेंगलुरुकडून पदार्पण केले होते. मिचेल स्टार्क हा जागतिक पातळीवर सर्वात जास्त मागणी असलेला गोलंदाजांपैकी एक आहे. परंतु दुखापतीमुळे त्याने अनेकदा आयपीएल हंगामातून माघार घेतली. तसेच आंतरराष्ट्रीय संघाच्या वेळापत्रकामुळे अनेकदा आयपीएलसाठी त्याची उपलब्धचा प्रभावित झाली.
अर्शदीप सिंग - १८ कोटी (पंजाब किंग्ज ) RTM
कगिसो रबाडा - १०.७५ कोटी( गुजरात टायटन्स)
श्रेयस अय्यर - २६.७५ कोटी (पंजाब किंग्ज)
जोस बटलर - १५.७५ कोटी (गुजरात टायटन्स)
मिचेल स्टार्क - ११.७५ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स)
रिषभ पंत - २७ कोटी (लखनऊ सुपरजायंट्स)
मोहम्मद शमी - १० कोटी (सनरायझर्स हैदराबाद)
डेव्हिड मिलर -७.५० कोटी (लखनऊ सुपर जायंट्स)
युझवेंद्र चहल - १८ कोटी ( पंजाब किंग्ज)
मोहम्मद सिराज - १२.२५ कोटी ( गुजरात टायटन्स)
लियाम लिविंगस्टन - ८.७५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु)
केएल राहुल - १४ कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
Edited By: Priyanka Mundinkeri