Rahul Dravid Biopic: राहुल द्रविडच्या बायोपिकमध्ये 'द वॉल' कोण साकारणार? दिली मोठी हिंट

Rahul Dravid On His Biopic: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं त्यांनी हटके उत्तर दिलं आहे.
Rahul Dravid Biopic: राहुल द्रविडच्या बायोपिकमध्ये 'द वॉल' कोण साकारणार? दिली मोठी हिंट
rahul dravidyandex
Published On

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता जवळपास सर्वच खेळाडूंवर बायोपिक बनवला जात आहे. आतापर्यंत एमएस धोनी, सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंवर बायोपिक बनवण्यात आला आहे.

नुकताच युवराज सिंगच्या आयुष्यावरही बायोपिक बनवला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी हटके उत्तर दिलं आहे.

राहुल द्रविड यांनी बुधवारी (२१ ऑगस्ट) मुंबईत झालेल्या सिएट क्रिकेट अवॉर्ड शो ला हजेरी लावली होती. त्यावेळी राहुल द्रविड यांना बायोपिकबाबत प्रश्न विचारण्यात आला. ' जर तुमच्या आयुष्यावर बायोपिक बनवला तर तुम्ही कुठल्या अभिनेत्याची निवड कराल?' या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, ' मला स्वतःला माझी भूमिका करायला आवडेल..'

मैदानावर नेहमी गंभीर असणारे राहुल द्रविड यांनी मजेशीर उत्तर दिलं. ते म्हणाले, ' जर ही भूमिका करण्यासाठी जास्त पैसे मिळत असतील, तर मीच ही भूमिका करेल. '

Rahul Dravid Biopic: राहुल द्रविडच्या बायोपिकमध्ये 'द वॉल' कोण साकारणार? दिली मोठी हिंट
IND vs AUS: टीम इंडियात या दोन खेळाडूंचा समावेश होणार का?, माजी क्रिकेटरने दिली प्रतिक्रिया

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली जिंकली टी -२० वर्ल्डकप ट्रॉफी

राहुल द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ स्वीकारल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये वेगळीच क्रांती पाहायला मिळाली आहे. भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ , वनडे वर्ल्डकप २०२३ आणि टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

यापैकी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला. तर उर्वरित २ फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Rahul Dravid Biopic: राहुल द्रविडच्या बायोपिकमध्ये 'द वॉल' कोण साकारणार? दिली मोठी हिंट
Team India News: टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार खेळाडूचं कमबॅक होणं कठीण; जय शहांनी दिली मोठी अपडेट

राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा २०२३ मध्ये संपला होता. मात्र रोहित शर्माने त्यांना थांबवून घेतलं. टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही त्यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ठरली. या कामगिरीच्या बळावर त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com