IND vs AUS: टीम इंडियात या दोन खेळाडूंचा समावेश होणार का?, माजी क्रिकेटरने दिली प्रतिक्रिया

काही दिवसातच आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे.
Asia Cup 2022, IND vs AUS
Asia Cup 2022, IND vs AUS SAAM TV
Published On

नवी दिल्ली : काही दिवसातच आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत. यासाठी टीम इंडियाला (Team India) अजून ६ टी२० सामने खेळायचे आहेत. पहिला सामान २० सप्टेंबर रोजी मोहाला येथे होणार आहे. या सामन्याअगोदर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात कन्फूज आहे. यावर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनिल गावस्करने एक सल्ला दिला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिला सामना मोहालीत होणार आहे. या सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनचा संभ्रम दूर करत गावस्कर यांनी दोन्ही यष्टिरक्षकांची संघात निवड करावी, असे म्हटले आहे.

Asia Cup 2022, IND vs AUS
विराट कोहली अन् धोनीचं नाव घेणं आधी बंद करा; गौतम गंभीर इतका का भडकला?...

“मला ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांसोबत खेळायला आवडेल. मी ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर, हार्दिक पंड्याला (Hardik Pandey) सहाव्या क्रमांकावर आणि दिनेश कार्तिकला सातव्या क्रमांकावर ठेवणार आहे. ऋषभ आणि हार्दिक यांच्यात क्रम बदलू शकतो. मी गोलंदाजांच्या रूपात हार्दिक आणि इतर चार पर्याय घेईन. तुम्ही जोखीम घेतली नाही तर जिंकणार कसे? तुम्हाला सर्व विभागांमध्ये धोका पत्करावा लागेल, असंही गावस्कर म्हणाले.

Asia Cup 2022, IND vs AUS
Virat-Hardik Dance : 'शाका बूम' गाण्यावर विराट-हार्दिकचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

गेल्या काही महिन्यांपासून ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना पर्यायी संधी मिळत आहे. मात्र, काही सामन्यांमध्ये हे दोन खेळाडू एकत्र खेळतानाही दिसले आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांनी वर्ल्ड कपमध्ये जोखीम पत्करण्याची गरज असल्याचे गावस्कर यांचे मत आहे. त्यांनी कार्तिकला सातव्या क्रमांकावर खेळवले पाहिजे.

भारतीय संघ व्यवस्थापनाने दिनेश कार्तिकचा फिनिशर म्हणून वापर करावा, असेही गावस्कर म्हणाले. आयपीएल 2022 मध्ये, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी शेवटच्या काही षटकांमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवला. भारतीय संघानेही (Team India) तोच मार्ग अवलंबला पाहिजे. गेल्या काही काळापासून कार्तिकची कामगिरी खूपच चमकदार आहे, असंही गावस्कर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com