T20 World Cup 2024: टी -२० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची ICC कडे तक्रार

ICC T20 World Cup, Warm Up Match: आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा सराव सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने आयसीसीकडे तक्रार केली आहे.
T20 World Cup 2024:टी -२० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची ICC कडे तक्रार
indian cricket teamtwitter

टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी सर्व खेळाडू अमेरिकेत दाखल झाले आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने कसून सरावाला देखील सुरुवात केली आहे. विराट होली देखील अमेरिकेला जाण्यासाठी रवाना झाला आहे दरम्यान भारतीय संघाच्या सराव सत्रातील काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान या सराव सत्रात भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ, मिळणाऱ्या सुविधांमुळे नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारतीय संघाचे सामने सकाळी होणार आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडू सकाळच्या वेळी सराव करण्यावर अधिक भर देताना दिसून येत आहेत. विराट कोहली अजूनही अमेरिकेत दाखल झालेला नाही. बुधवारी भारतीय संघाचा पहिला सराव सत्र पार पडला. हे सराव सत्र संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मिळणाऱ्या सुविधांमुळे तक्रार केली आहे.

भारतीय संघ शनिवारी (१ जून ) बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तोपर्यंत भारतीय संघ कॅंटिंग पार्कमध्ये मिळणाऱ्या सुविधांचा वापर करणार आहे. त्यानंतर देखील भारतीय संघाला इथेच सराव करावा लागणार आहे. कारण भारतीय संघाचे पाकिस्तान, अमेरिका आणि आयर्लंडविरुद्ध होणारे सामने हे न्यूयॉर्कमध्ये होणार आहेत. त्यानंतर भारतीय संघ एकमात्र सामना खेळण्यासाठी फ्लोरिडाला रवाना होणार आहे.

T20 World Cup 2024:टी -२० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची ICC कडे तक्रार
IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

भारतीय संघाचं साखळी फेरीतील सामन्यांचं वेळापत्रक

भारत विरुद्ध आयर्लंड - ५ जून न्यूयॉर्क

भारत विरुद्ध पाकिस्तान - ९ जून न्यूयॉर्क

भारत विरुद्ध अमेरिका - १२ जून न्यूयॉर्क

भारत विरुद्ध कॅनडा - १५ जून फ्लोरिडा

T20 World Cup 2024:टी -२० वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची ICC कडे तक्रार
Rinku Singh Statement: '१०- १५ रुपयांसाठी तरसायचो, आता ५५ लाख..', IPL च्या मानधनाबाबत रिंकू सिंगचं मोठं वक्तव्य

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com