Virat kohli
Virat kohli Saam Tv

Virat Kohli| विराट कोहलीची ICC T20 रँकिंगमध्ये मोठी झेप

ICC T20 रँकिंगमध्ये पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहलीने १४ फलंदाजांना मागे टाकले आहे.
Published on

नवी दिल्ली : ICC T20 रँकिंगमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) मोठी झेप घेतली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावणाऱ्या विराटने आता १४ फलंदाजांना मागे टाकून १५व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कोहलीने UAE मध्ये झालेल्या स्पर्धेत जोरदार फलंदाजीनंतर केली. जवळपास तीन वर्षांत त्याने पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

Virat kohli
T20 World Cup : केएल राहुलला संघातून वगळा; विराटला सलामीला पाठवा, गावस्करांचा सल्ला

टीम इंडियातील (Team India) मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवने रँकिंगमध्ये ७५५ गुणांसह चौथ्या स्थानावर कायम राहिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान ८१० गुणांसह आघाडीवर आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही ६०६ गुणांसह चौदाव्या स्थानावर आहे. तर गोलंदाजांच्या यादीत, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार पहिला स्थानावरुन घसरून सातव्या स्थानावर आहे, तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या रँकिंगमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. हरिस रौफ आणि मोहम्मद नवाज या पाकिस्तानी गोलंदाजांनी आशिया चषक स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर सर्वाधिक फायदा मिळवला.

Virat kohli
T 20 World Cup : टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? 'यांना' संधी मिळणार का?

बाबर आझम आशिया कप सुरू होण्यापूर्वी तो नंबर १ फलंदाज होता. पण मधल्या टूर्नामेंटमध्ये तो २ ऱ्या क्रमांकावर आला आणि आता तो ३ व्या क्रमांकावर घसरला. बाबरच्या जागी आता दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताकडून सध्या फक्त एकच फलंदाज टी-20 क्रमवारीत अव्वल १० मध्ये आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, तर रोहित शर्मा १४व्या आणि विराट कोहली १५व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार ७व्या क्रमांकावर आहे त्याने पहिले स्थान गमावले आहे.

भारतीय महिला फलंदाजांमध्ये स्मृती मानधना चौथ्या क्रमांकावर आहे. शेफाली वर्मा टी-20 क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. जेमिमाह रॉड्रिग्ज १० व्या स्थानावर आहे. हरमनप्रीत कौर १५ व्या स्थानावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com