T20 World Cup : केएल राहुलला संघातून वगळा; विराटला सलामीला पाठवा, गावस्करांचा सल्ला

'कोहली जेव्हाही आयपीएलमध्ये ओपनिंगला येतो, तेव्हा आम्ही त्याला शानदार खेळी करताना पाहतो'.
T20 World Cup KL Rahul Virat Kohli
T20 World Cup KL Rahul Virat KohliSaam TV
Published On

T20 World Cup : टी-20 विश्वचषकासाठी भारतीय (Team India) संघाची घोषणा झाली. या घोषणेनंतर आता वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. भारतीय संघाच्या निवडीवर कुणी खूश आहे तर निवड न झाल्याने कुणी नाराज आहे. स्पर्धेचं लक्ष्य निश्चित करताना भारतानं कशी फलंदाजी करावी यावर बऱ्याच चर्चा सुरू आहेत. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज रोहन गावस्करने विराट कोहलीच्या फलंदाजी क्रमाबाबत मोठी गोष्ट सांगितली. (T20 World Cup Team India Playing XI)

T20 World Cup KL Rahul Virat Kohli
T 20 World Cup : टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? 'यांना' संधी मिळणार का?

एका क्रिडावाहिनीसोबत चर्चा करताना रोहन गावस्करने विराट कोहलीच्या फलंदाजी स्पॉटबाबत मोठं विधान केलं आहे. विराट कोहली सलामीला फलंदाजीसाठी आला पाहिजे, असं मत गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे. 'विराट कोहलीची पहिल्या क्रमांकावरची फलंदाजी बघितली की, टी-20 विश्वचषकात सलामी दिली पाहिजे, कारण त्याच्या सलामीच्या सरासरीची आकडेवारी चांगली आहे'. असं गावस्कर म्हणाले.

गावस्कर पुढे म्हणाले की, विराट कोहली जेव्हाही आयपीएलमध्ये ओपनिंगला येतो, तेव्हा आम्ही त्याला शानदार खेळी करताना पाहतो. अशा स्थितीत कोहलीला कर्णधार रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) सलामी देणे चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे विराट कोहलीला सलामीला पाठवा आणि केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवा. असं मत गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.

T20 World Cup KL Rahul Virat Kohli
T20 World Cup : विराट कोहलीपेक्षा किती वेगळी आहे रोहित शर्माची टीम, जाणून घ्या ५ मोठे बदल

दरम्यान, विराट कोहली रोहित शर्मासोबत सलामीला आला, तर केएल राहुलला बाहेर जावं लागेल. केएल राहुल जरी चांगला खेळाडू असला तरी त्याचा सद्याचा फॉर्म भारतीय संघासाठी फायदेशीर नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी रोहन गावस्कर यांनी सूर्यकुमार यादवचे नाव सूचवले आहे. सूर्यकुमार हा विस्फोटक फलंदाज असून तो फिरकी गोलंदाजी चांगली खेळू शकतो असं गावस्कर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विराटची सलामीची सरासरीही 55 ते 57 अशी आहे. त्याचा स्ट्राईक रेटही जवळपास 160 आहे, अलीकडेच त्याने आशिया कपमध्ये सलामी करताना अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले होते, जे त्याचे T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक होते. आशिया कप 2022 मध्ये विराट कोहलीने 5 सामन्यात एकूण 276 धावा केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com