

ICC World Cup 2023: आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरूद्ध न्युझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठं स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
मंगळवारी( २७ जून) झालेल्या एका भव्य कार्यक्रमात आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. तब्बल ४६ दिवस ४८ रोमांचक सामने पाहायला मिळणार आहे. आता सामन्याच्या वेळेत देखील मोठा बदल करण्यात आला आहे.
या स्पर्धेत सकाळी होणारे सामने सकाळी १०:३० वाजता सुरु होणार आहेत. तर दिवस- रात्र म्हणजेच दुपारी होणारे सामने हे २ वाजता सुरु होणार आहेत. आयपीएल प्रमाणेच शनिवारी डबल हेडर सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहेत. तर रविवारी केवळ एकच सामना खेळवला जाणार आहे.
सामन्याच्या वेळात बदल का?
भारतात वनडे सामने २:३० वाजता सुरु होतात. मात्र वनडे वर्ल्ड कपवेळी भारतात थंडी असणार आहे. त्यामुळे डे -नाईटचे सामने अर्धा तास आधी म्हणजेच २ वाजता सुरु होणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ वेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्व होणार आहे.
हा सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना काही कारणास्तव पुढे ढकलला गेला. तर २० नोव्हेंबर हा दिवस राखीव दिवस असेल. (Latest sports updates)
सेमीफायनल आणि फायनलसाठी राखीव दिवसाची घोषणा..
या स्पर्धेतील नॉक आउटचे सामने दुपारी २ वाजता सुरु होणार आहेत. या सामन्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. जर सामन्याच्या वेळी पाऊस पडला तर सामना पुढे ढकलण्यात येईल.
या स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना म्हणजे, भारत- पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधुन हलवुन दुसऱ्या ठिकाणी खेळवण्यात यावा अशी मागणी पाकिस्तानने केली होती. मात्र बीसीसीआयने ही मागणी फेटाळून लावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.