Virat Kohli Instagram Story: 'माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका...',वर्ल्डकपच्या एक दिवसापूर्वी विराटची Insta स्टोरी चर्चेत

World Cup 2023: वर्ल्डकपच्या १ दिवसापूर्वी विराटची Insta स्टोरी चर्चेचा विषय ठरतेय.
Virat Kohli Instagram Story
Virat Kohli Instagram StorySaam tv news
Published On: 

Virat Kohli Instagram Story:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेचं आयोजन भारतात होत असलं तरीदेखील सामन्याचं तिकीट मिळणं खुप कठीण झालं आहे. ऑनलाईन तिकिट विक्रिला येताच अवघ्या काही मिनिटात तिकीटं संपली.

एकाच वेळी लाखो युझर्स तिकीट बुक करण्यासाठी आल्याने साईट देखील क्रॅश झाली होती. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे तिकीट मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान नुकताच विराट कोहलीच्या इंस्टाग्राम स्टोरीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Virat Kohli Instagram Story
Asian Games 2023: ये दिल मांगे मोर...आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा भीमपराक्रम! मेडल्सच्या बाबतीत मोडला स्वत:चाच रेकॉर्ड

वर्ल्डकपच्या एक दिवसापूर्वी विराट कोहलीने एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात त्याने आपल्या मित्रांना वर्ल्डकप सामन्यांचे तिकीट मागू नका, असं म्हटलं आहे.

विराटने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले की, 'आता वर्ल्डकप सुरू होणार आहे. मी माझ्या मित्र मंडळींना विनंती करू इच्छितो की, कोणीही मला वर्ल्डकपचे तिकीट मागू नका. तुमच्या घरूनच सामन्यांचा आनंद घ्या.' (Latest sports updates)

विराट कोहलीची स्टोरी व्हायरल होताच अनुष्का शर्माने देखील ही स्टोरी आपल्या इंस्टाग्राम अंकाऊंटवर शेअर केली आहे. ही स्टोरी शेअर करत तिने कॅप्शन म्हणून लिहिले की,' आणि तुमच्या मेसेजला उत्तर आलं नाही, तर माझ्याकडे मदत मागण्यासाठी येऊ नका..धन्यवाद.'

२०१७ मध्ये अडकले होते विवाह बंधनात..

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी सर्वात प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे. दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रात खुप पुढे गेले आहेत. विराट कोहली हा यशस्वी क्रिकेटपटू आहे. तर अनुष्का शर्मा ही अभिनय क्षेत्रात आघाडीची अभिनेत्री आहे.

Virat Kohli Instagram Story
Asian Games 2023: मराठमोळ्या ओजसने इतिहास रचला; तिरंदाजीत भारतासाठी पटकावलं पहिलंच गोल्ड मेडल

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघेही २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले होते. तिचे नाव त्यांनी वामिका असे ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.