

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी ४ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा ओपनिंग सोहळा पार पडणार आहे.
हा सोहळा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा दिवस कॅप्टन दिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा आयसीसीने केली आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार ओपनिंग सोहळा..
स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोहळ्यासाठी सर्व कर्णधार उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या सोहळ्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी स्पर्धेला प्रारंभ होईल.
वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेले संघ आणि संघाचे कर्णधार..
भारत - रोहित शर्मा
पाकिस्तान - बाबर आझम
इंग्लंड - जोस बटलर
ऑस्ट्रेलिया - पॅट कमिन्स
न्यूझीलंड - टॉम लेथम ( जर केन विलियमन खेळणार नसेल तर)
श्रीलंका - दासून शनाका
बांगलादेश - शाकिब अल हसन
नेदरलँड - स्कॉट एडवर्ड्स
अफगाणिस्तान - हसमतुल्लाह शाहिदी
दक्षिण आफ्रिका - तेंबा बावूमा (Latest sports updates)
या दिवशी रंगणार भारतीय संघाचा पहिला सामना..
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आपला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात करणार आहे.
हा सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईचा मैदानावर रंगणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान या बहुप्रतीक्षित सामना १४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर स्पर्धतील अंतिम सामना देखील १९ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.