भारताशिवाय Champions Trophy होऊच शकत नाही.. PCB ला धडा शिकवण्यासाठी ICC ने उचललं मोठं पाऊल

ICC Champions Trophy 2025 Update: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारताशिवाय Champions Trophy  होऊच शकत नाही.. PCB ला धडा शिकवण्यासाठी ICC ने उचललं मोठं पाऊल
icctwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला आहे.

तर पाकिस्तानने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्यास नकार दिला आहे. हेच कारण आहे की, आयसीसीने अजूनही या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. दरम्यान हा वाद सुरु असतानाच आयसीसीने मोठं पाऊल उचललं आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, आयसीसीचे अधिकारी पीसीबीसोबत चर्चा करत आहेत. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये व्हावी म्हणून आयसीसीचे अधिकारी पीसीबीच्या अधिकाऱ्यांची समजूत काढत आहे.

आयसीसी पीसीबीला पटवून देण्याच्या प्रयत्नात आहे की, भारतीय संघाशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी होऊच शकत नाही. त्यामुळे आयसीसीचे अधिकारी पीसीबीच्या अधिकाऱ्यांना हायब्रिड मॉडेलचं महत्व पटवून देत आहेत.

भारताशिवाय Champions Trophy  होऊच शकत नाही.. PCB ला धडा शिकवण्यासाठी ICC ने उचललं मोठं पाऊल
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! प्रमुख फलंदाजाला बसवलं

भारताचा पाकिस्तानात जाण्यास नकार

भारतीय संघ आधीपासूनच पाकिस्तान खेळण्यासाठी जाण्याच्या विरोधात आहे. बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहून पाकिस्तानात जाण्यास नकार कळवला आहे. तर पीसीबीचं म्हणणं आहे की, भारतीय संघाने पाकिस्तानात यावं.

कारण, आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा भारतात पार पडली होती. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. त्यापूर्वी झालेल्या आशिया कप २०२३ स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते.

भारताशिवाय Champions Trophy  होऊच शकत नाही.. PCB ला धडा शिकवण्यासाठी ICC ने उचललं मोठं पाऊल
IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

मात्र त्यावेळीही भारताने नकार दिल्याने, या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले गेले होते. माध्यमातील वृत्तानुसार, जर ही स्पर्धा हायब्रिड मॉलडेलमध्ये खेळवली गेली, तर भारतीय संघाचे सामने यूएईत होऊ शकतात.

वेळापत्रक केव्हा जाहीर होणार?

आयसीसी कुठल्याही स्पर्धेचे वेळापत्रक १०० दिवसांआधी जाहीर करते. मात्र या स्पर्धेचे वेळापत्रक अजूनही जाहीर करण्यात आलेलं नाही. माध्यमातील वृत्तानुसार, या स्पर्धेचे वेळापत्रक या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते.

भारताशिवाय Champions Trophy  होऊच शकत नाही.. PCB ला धडा शिकवण्यासाठी ICC ने उचललं मोठं पाऊल
IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com