Champions Trophy Final 2025: भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं! केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?

Champions Trophy Final 2025 Venue: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Champions Trophy Final 2025: भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं! केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?
team indiatwitter
Published On

भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३ मध्ये इंग्लंड त्यानंतर २०१७ मध्ये भारताचा फायनलचा सामना पाकिस्तानविरुद्ध पार पडला होता.

आता भारतीय संघाने सेमीफायनलच्या साामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवत सलग तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान भारताचा फायनलचा सामना केव्हा, कुठे आणि कोणत्या संघाविरुद्ध होणार? जाणून घ्या.

Champions Trophy Final 2025: भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं! केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?
Ind Vs Aus: बॉल स्टंपला लागला पण स्मिथ आऊट झालाच नाही; पाहा नेमकं काय घडलं? Video

फायनल केव्हा, कुठे अन् कधी होणार?

भारताचा संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. भारताचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४ गडी राखून विजयाची नोंद केली. यासह भारताने दणक्यात फायनलमध्ये एन्ट्री केली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे . या सामन्यात विजय मिळवणारा संघ ९ मार्चला भारतीय संघाविरुद्ध फायनलचा सामना खेळणार आहे.

Champions Trophy Final 2025: भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं! केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?
Champions Trophy 2025 : रोहित सेना काळी पट्टी बांधून का उरतलीये मैदानात? हे आहे खरं कारण

केव्हा होणार फायनलचा सामना ?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना ९ मार्चला होणार आहे.

कुठे होणार सामना?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडणार आहे. जर भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला नसता, तर हा सामना नियोजित वेळापत्रकानुसार लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये खेळवला गेला असता. मात्र आता भारताने फायनलमध्ये प्रवेश केल्याने हा सामना दुबईत खेळवला जाणार आहे.

Champions Trophy Final 2025: भारताचा विजय अन् फायनलचं ठिकाण बदललं! केव्हा, कधी अन् कुठे होणार सामना?
Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, पण सेमीफायनल जिंकणार कोण? अंदाज आला समोर

या सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरुवात होईल.

कोणत्या २ संघांमध्ये होणार फायनल?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. भारतीय संघ फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्यातून विजय मिळवणारा संघ फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com