
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी सुरु आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना एक घटना घडली. यामध्ये कांगारूंचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ बोल्ड होता होता थोडक्यात वाचला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित शर्माने अक्षर पटेलला ओव्हर दिली होती. यावेळी अक्षरचा बॉल स्मिथच्या बॅटला लागला आणि मागील बाजूस गेला. हा बॉल जमिनीवर लागून हलकासा स्टंप्सना लागला मात्र बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे लकी स्मिथ अगदी थोडक्यात वाचला. १३ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ही घटना घडली.
भारतीय संघाने सामन्यात भारताचे माजी क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी काळी पट्टी बांधली आहे. सोमवारी पद्माकर शिवलकर यांचे निधन झालं. ८४ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शिवलकर हे फिरकीपटू होते. १९६१-६२ पासून १९८७-८८ पर्यंत १२४ प्रथम श्रेणीतील सामने त्यांनी मुंबईकडून खेळले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.