Team India Playing XI: एका खेळाडूमुळे रोहितची डोकेदुखी वाढली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार?

Team India Playing XI Prediction, IND vs AUS Semi Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.
Team India Playing XI: एका खेळाडूमुळे रोहितची डोकेदुखी वाढली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार?
rohit sharmatwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानचा पराभव केला. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला धूळ चारत सलग ३ सामने जिंकले. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही बदल करण्यात आले होते. आता याच बदलामुळे रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे.

Team India Playing XI: एका खेळाडूमुळे रोहितची डोकेदुखी वाढली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार?
IND vs AUS Record: भारत- ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये भिडणार? कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळणार?

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये एकमेव बदल करण्यात आला होता. हर्षित राणाच्या जागी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले होते.

रोहित आणि गंभीरचा हा मास्टरस्ट्रोक न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरला. वरुणने ५ गडी बाद करत भारतीय संघाचा विजय खेचून आणला. यासह त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. त्याला यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या सामन्यात त्याला संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं केलं.

Team India Playing XI: एका खेळाडूमुळे रोहितची डोकेदुखी वाढली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार?
IND vs AUS: १४० कोटी भारतीयांच्या मनात अजूनही ती सल.. रोहितसेना कांगारुंचा वचपा काढणार?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत ४ फिरकी गोलंदाजांसह उतरणार भारतीय संघ?

यापूर्वी झालेल्या दोन्ही सामन्यांसाठी जी प्लेइंग ११ निवडण्यात आली होती, त्या प्लेइंग ११ मध्ये हर्षित राणा, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद शमी या ३ वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला होता. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहितने ४ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला, तर हर्षित राणाला विश्रांती दिली. न्यूझीलंडविरुद्ध हा प्लान फायदेशीर ठरला. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना हा प्लान काम करेल का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल.

Team India Playing XI: एका खेळाडूमुळे रोहितची डोकेदुखी वाढली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार?
IND vs AUS: सेमीफायनलआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर

एकटा वरुण न्यूझीलंडवर पडला भारी

दुबईत फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. वरुण चक्रवर्तीने याचा चांगलाच फायदा घेतला. वरुणसह अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांना देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आले होते. वरुणने या डावात ५ गडी बाद केले. जडेजाला वगळलं, तर उर्वरीत सर्व गोलंदाजांनी किमान १ तरी गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com