Asif Khan doping case : क्रिकेटविश्वात खळबळ! अनुभवी फलंदाजावर १५ महिन्यांची बंदी, ४ वर्षांपूर्वी पदार्पण केलेल्या खेळाडूवर ICC ची कारवाई

UAE batter Asif Khan banned until December 2026 by ICC : आयसीसीने अनुभवी क्रिकेटपटू आसिफ खान याच्यावर १५ महिन्यांची बंदी घातली आहे. आयसीसीने ही कारवाई केली आहे. आयसीसीने सुनावलेली शिक्षा क्रिकेटपटूनं स्वीकारली आहे.
अनुभवी फलंदाजावर आयसीसीची मोठी कारवाई, १५ महिन्यांची बंदी
आयसीसीने क्रिकेटपटूवर १५ महिन्यांची बंदी घातली आहे. AI imagesaam tv
Published On

सन २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, संघासाठी ३८ एकदिवसीय आणि ५६ टी २० सामन्यांत खेळताना दमदार कामगिरी करणाऱ्या यूएईच्या अनुभवी फलंदाजावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. आसिफ खान असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. प्रतिबंधित पदार्थाचं सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर आयसीसीने त्याच्यावर १५ महिन्यांची बंदी घातली आहे.

संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईचा अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तो या प्रकरणात दोषी आढळला. आयसीसी अँटी डोपिंग कोडचं उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्यानं याबाबत कबुलीही दिली आहे. आयसीसीने सुनावलेल्या शिक्षेचा खान यानं स्वीकारही केला आहे.

आसिफ खानवर बंदी कधीपर्यंत?

३६ वर्षीय आसिफ खानच्या घेतलेल्या नमुन्यांमध्ये मेस्टेरोलोनचा मेटाबोलाइट आढळून आला होता. ८ सप्टेंबर २०२५ मध्ये त्याची तपासणी केली होती. त्यात त्यानं प्रतिबंधित पदार्थाचं सेवन केल्याचं आढळून आलं. त्यानंतर आसिफने आयसीसी अँटी डोपिंग कोडच्या अनुच्छेद २.१ चे उल्लंघन केल्याचं कबुल केलं होतं. आसिफवर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. ८ सप्टेंबर २०२५ पासून ती लागू करण्यात आली. ७ डिसेंबर २०२६ पर्यंत ती असेल. तो ८ ऑक्टोबर २०२६ पासून कोणत्याही संघासोबत तो ट्रेनिंग घेऊ शकतो, तसेच क्लब किंवा अन्य आयसीसीचे सदस्यत्व असलेल्या संस्थांच्या सुविधांचा लाभही घेऊ शकेल. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये त्याचं कमबॅक ८ डिसेंबर २०२६ पासून होण्याची शक्यता आहे.

अनुभवी फलंदाजावर आयसीसीची मोठी कारवाई, १५ महिन्यांची बंदी
क्रीडा विश्वात मोठी खळबळ! बलात्कार प्रकरणात अडकला स्टार खेळाडू, कोर्टाकडून तात्काळ अटक करण्याचे आदेश अन्...

शिक्षेला आव्हान देणार नाही

आयसीसीच्या नियमांनुसार, ८ सप्टेंबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीतली आसिफची वैयक्तिक कामगिरीही ग्राह्य धरली जाणार नाही. त्याला मिळालेली पदके, गुण, पुरस्कार रक्कम किंवा अन्य पुरस्कार यावरील त्याचा दावाही संपुष्टात येईल. तसेच या निर्णयाविरोधात अपील करण्याचाही त्याला अधिकार नसेल. तत्पूर्वी, आसिफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२२ मध्ये पदार्पण केलं होतं.

यूएई संघासाठी ३८ एकदिवसीय आणि ५६ टी २० सामने खेळला. त्याच्यावर बंदी घातल्यानं यूएई क्रिकेट संघाला मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. तो संघातील अनुभवी खेळाडू आहे. आता बंदीचा कालावधी संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. अलीकडेच आयसीसीने एका क्रिकेटपटूवर आठ वर्षांची बंदी घातली होती.

अनुभवी फलंदाजावर आयसीसीची मोठी कारवाई, १५ महिन्यांची बंदी
Yashasvi Jaiswal: बोल्ड झाल्यानंतर यशस्वी जैयस्वालचा संताप अनावर, श्रीलंकन गोलंदाजाशी थेट मैदानात भिडला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com