WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा WTC Final मध्ये भिडणार? टीम इंडियाला करावं लागेल हे एकच काम

Team India WTC Final Scenario: भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या.
WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा WTC Final मध्ये भिडणार? टीम इंडियाला करावं लागेल हे एकच काम
wtc final
Published On

World Test Championship, Team India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मायदेशात कधीच व्हॉईटवॉश न झालेल्या भारतीय संघाने पहिल्यांदाच ३-० ने कसोटी मालिका गमावली. या पराभवाचा भारतीय संघाला मोठा फटका बसणार आहे.

या मालिकेपूर्वी भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र आता मार्ग जरा खडतर झाला आहे. फायनल गाठणं कठीण दिसत असलं तरीदेखील अशक्य नाहीये. भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल? जाणून घ्या.

अव्वल स्थान गमावलं

ही मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ मजबूत स्थितीत होता. गेल्या २ वेळेस फायनलमध्ये प्रवेश करणारा भारतीय संघ तिसऱ्यांदाही फायनलमध्ये जाणार,हे जवळजवळ स्पष्ट होतं. मात्र न्यूझीलंडने मायदेशात भारताला पराभूत केलं आणि भारताचं समीकरण बिघडवलं. आता भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा WTC Final मध्ये भिडणार? टीम इंडियाला करावं लागेल हे एकच काम
IND vs NZ: टीम इंडियाचं नेमकं चुकलं तरी कुठं? मास्टर ब्लास्टरने सांगितलं कारण

भारतीय संघासाठी कसं असेल समीकरण?

येत्या २२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. स्पर्धेतील फायनल गाठण्यासाठी भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत ५ पैकी ४ सामने जिंकावे लागणार आहेत. जर भारताने ऑस्ट्रेलियाचा ४-१ ने पराभव केला, तर भारतीय संघाचा फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

WTC Scenario: भारत- ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा WTC Final मध्ये भिडणार? टीम इंडियाला करावं लागेल हे एकच काम
IND vs AUS: टीम इंडियाला BGT जिंकायचीये तर सुनील गावसकरांचा हा सल्ला ऐकावाच लागेल

कोणता संघ कितव्या स्थानी?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ६२.५० इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय संघाची विजयाची सरासरी ५८.३३ इतकी आहे.

तर श्रीलंकेची विजयाची सरासरी ५५.३३ इतकी आहे. चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडची विजयाची सरासरी ५४.५५ इतकी आहे. तर ५४.१७ टक्के विजयाच्या सरासरीसह दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com