Ishan Kishan Comeback: ..तरच इशान किशन संघात कमबॅक करु शकतो!राहुल द्रविडने सांगितला एकमेव पर्याय

Rahul Dravid On Ishan kishan: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील मालिकेपासून इशान किशन संघाबाहेर आहे. तो संघात केव्हा परतणार? तो संघाबाहेर का झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत
ishan kishan rahul dravid
ishan kishan rahul dravidsaam tv news
Published On

Rahul Dravid On Ishan kishan Comeback:

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील मालिकेपासून इशान किशन (Ishan Kishan) संघाबाहेर आहे. तो संघात केव्हा परतणार? तो संघाबाहेर का झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकताच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीचे २ सामने पार पडले आहेत.

ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. तर मालिकेतील उर्वरित २ सामन्यांसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान भारतीय संघाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी इशान किशनबद्दल भाष्य केलं आहे.

राहुल द्रविड यांनी इशान किशनबद्दल बोलताना म्हटले की,'प्रत्येकाला कमबॅक करण्याचा मार्ग मोकळा आहे. मला इशान किशनच्या मुद्द्यावर फार काही बोलायचं नाही. माझ्याकडून शक्य होईल तितकं मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने स्वत:हुन ब्रेक मागितला होता. त्याला ब्रेक देऊन आम्हालाही आनंदच झाला.' (Rahul Dravid On Ishan Kishan)

तसेच इशान किशनच्या कमबॅकबद्दल बोलताना तो म्हणाला की,'तो जेव्हा खेळण्यासाठी सज्ज होईल तेव्हा त्याने देशांतर्गत क्रिकेटच खेळावं असं माझं मुळीच म्हणणं नाही. त्याला केवळ क्रिकेट खेळावं लागेल आणि कमबॅक करावं लागेल. त्याला केव्हा कमबॅक करायचं आहे हे त्याने स्वतःहून ठरवावं. आम्ही त्याला काहीच करण्यासाठी भाग पाडलं नाहीये.' (Cricket news in marathi)

ishan kishan rahul dravid
IND vs ENG Test Series: सामना जिंकूनही टीम इंडियाची डोकेदुखी वाढली; या कारणांमुळे मालिका जिंकणं कठीण

सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत केएस भरत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. तो यष्टीरक्षक म्हणून सुपरहिट ठरतोय. मात्र फलंदाजीत तो संघासाठी धावा करु शकलेला नाही. त्यामुळे केएस भरतला संघाबाहेर करुन इशान किशनला संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. रिषभ पंतच्या कारचा अपघतानंतर इशान किशनला सातत्याने संधी दिली जातेय.

ishan kishan rahul dravid
Rohit Sharma Catch : रोहित शर्मानं ०.४५ सेकंद रिॲक्शन टाईममध्ये घेतला भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच

इशान किशनबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की,'आम्ही इशान किशनच्या संपर्कात आहोत. मात्र अजूनपर्यंत त्याने सराव सुरु केलेला नाही. त्यामुळे आम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाहीये. मला विश्वास आहे की, निवडकर्ते सर्व गोष्टींचा विचार करतील.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com