

भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात १०० धावांनी एकहाती विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत पु्न्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या ६ पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
तर दुसरीकडे ६ पैकी १ सामना जिंकणारा इंग्लंडचा संघ वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमधून बाहेर पडला आहे. दरम्यान भारतीय संघाचा आनंद द्विगुणित करणारी बातमी समोर आली आहे.
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर झाला होता. दुखापतीमुळे न्यूझीलंड आणि इंग्लंडविरूद्धच्या सामन्यातून त्याला बाहेर राहावं लागलं आहे.
दरम्यान न्यूज १८ च्या वृत्तानूसार हार्दिक पंड्या सेमी फायनलमध्ये खेळताना दिसून येऊ शकतो. सध्या तो NCA मध्ये असून त्याच्या दुखापतीवर उपचार सुरु आहेत. एका सुत्राने दिलेल्या माहितीनूसार हार्दिक पंड्याने NCA च्या नेट सेशनमध्ये सहभाग घेतला होता. सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. (Latest sports updates)
हार्दिक पंड्या सध्या बंगळुरुत आहे. त्याला प्रवास करण्याची अनुमती दिली गेलेली नाही. भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे. हा सामना बंगळुरुत होणार आहे. हार्दिक पंड्या याच सामन्यावेळी भारतीय संघासोबत जोडला जाऊ शकतो.
तो साखळी फेरीतील सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता खुप कमी आहे. तो सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो.
हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान दिलं गेलं.
तर शार्दुल ठाकुरच्या जागी मोहम्मद शमीला संघात स्थान दिलं गेलं आहे. या दोघांनी भारतीय संघासाठी मोलाची भुमिका बजावली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.