Hardik Pandya : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हार्दिक पांड्याला देणार डच्चू? या खेळाडूची लागू शकते वर्णी

Mumbai Indian Captain : आगामी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची वर्णी लागू शकते.
hardik pandya
hardik pandyayandex
Published On

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल कर्णधारपदाच्या बाबतीत होऊ शकतो. हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची वर्णी लागू शकते. रोहित शर्मासह टीमचे अनेक खेळाडू पांड्याच्या कर्णधारपदावर समाधानी नसल्याची माहिती आहे. तर सचिन तेंडुलकरही सूर्याच्या बाजूने असल्याची सूत्रांची माहितीआहे.

hardik pandya
PAK vs BAN 1st Test : पाकिस्तानला घरात घुसून हरवले, रावळपिंडीत बांगलादेशचा १० विकेटनं विजय

मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाला अल्टिमेटम दिला आहे. रोहित आणि सचिनसह अनेक खेळाडूंना पांड्याने कर्णधारपदी राहावं असं वाटत नाही. मुंबईने हार्दिकला कर्णधारपदावर ठेवलं तर रोहित आणि सूर्या सोबत वेगवान गोलंदाज गोलंदाज जसप्रीत बुमराही संघ सोडू शकतो. याबाबत मुंबई कॅम्पमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.

मुंबईने IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याला संघात स्थान दिलं. पांड्या आधी गुजरात टायटन्सकडून खेळत होता. हार्दिक पांड्या येताच रोहितकडून कर्णधारपद हिसकावून घेण्यात आलं. मुंबईने रोहितला याची माहिती दिली नाही. त्याला न सांगता हा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम मुंबईतील सामन्यांवरही दिसून आला, असं मिडिया रिपोर्ट्सचं म्हणणं आहे. यामुळे रोहित आणि त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते.

hardik pandya
Manu Bhaker Father: नीरज अन् मनू भाकरची आई यांच्यात काय बोलणं झालं? मनूच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

हार्दिक पांड्या टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनणार होता. पण हे होऊ शकलं नाही. त्याच्या जागी सूर्याला कर्णधारपद देण्यात आलं. जय शाहही पांड्याच्या बाजूने होते. मात्र अजित आगरकर तसेच इतर खेळाडू आणि रोहितचं या निर्णयाला समर्थन नव्हतं. जय शहामुळेच पांड्या काही काळ उपकर्णधार राहिला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

hardik pandya
Shan Masood : पाकिस्तान टीमच्या ड्रेसिंग रूमध्ये राडा; बाबर आझमवर संतापला शान मसूद?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com