Harbhajan Singh: 'लाज वाटू द्या रे..'अर्शदीप सिंगची खिल्ली उडवणाऱ्या कामरान अकमलला हरभजनने झापलं

Harbhajan Singh On Kamran Akmal: कामरान अकमलने अर्शदीप सिंगची खिल्ली उडवली होती. आता हरभजन सिंगने त्याला झापलं आहे.
Harbhajan Singh: 'लाज वाटू द्या रे..'अर्शदीप सिंगची खिल्ली उडवणाऱ्या कामरान अकमलला हरभजनने झापलं
kamran akmal harbhajan singhgoogle

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखला जातो. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने शीख समुदायाची खिल्ली उडवल्यानंतर हरभजनने त्याला सुनावण्यात कुठलीच कसर सोडली नाही. दरम्यान हरभजन सिंगने झापल्यानंतर कामरान अकमलने लगेचच माफी देखील मागितली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

कामरान अकमलने शीख समुदायाची उडवली खिल्ली

भारत -पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानमध्ये एका टीव्ही शो वर चर्चा सुरु होती. ज्यात कामरान अकमलने देखील सहभाग घेतला होता. ज्यावेळी अर्शदीप सिंगबाबत चर्चा सुरु होती. त्यावेळी कामरान अकमलने म्हटले, 'बघा अर्शदीप सिंगला शेवटचं षटक टाकणार आहे. काहीही होऊ शकतं कारण.. बारा वाजले आहेत.' हे बोलून झाल्यानंतर तो जोरदार हसताना दिसून येत आहे.

Harbhajan Singh: 'लाज वाटू द्या रे..'अर्शदीप सिंगची खिल्ली उडवणाऱ्या कामरान अकमलला हरभजनने झापलं
IND vs PAK: रिझवानचा जीव थोडक्यात बचावला; सिराजच्या त्या बॉलवर नेमकं काय घडलं? - Video

हा व्हिडिओ व्हायरल होताच हरभजन सिंगने आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत लिहिले की, ' कामरान अकमल धन्यवाद.. घाणेरडं तोंड उघडण्यापूर्वी शीख समुदायाचा इतिहास जाणून घ्या. आमच्या शीख समुदायाने तुमच्या माता- भगिनींना वाचवलं होतं. जेव्हा त्यांचं अपहरण केलं गेलं होतं त्यावेळी १२ वाजलेली होती. लाज वाटली, थोडी कृतज्ञता बाळगा.'

Harbhajan Singh: 'लाज वाटू द्या रे..'अर्शदीप सिंगची खिल्ली उडवणाऱ्या कामरान अकमलला हरभजनने झापलं
SA vs BAN, T20 WC: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! अवघ्या २४ तासात मोडून काढला टीम इंडियाचा महारेकॉर्ड

हरभजन सिंगने झापल्यानंतर कामरान अकमलने एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी जे काही म्हटलं होतं त्यासाठी मला मनापासून वाईट वाटतंय. मी शीख समुदायाची मनापासून माफी मागतो. मी वापरलेले शब्द चुकीचे आणि अपमानास्पद होते. मी सर्व शीख बांधवांचा आदर करतो. कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. मी माफी मागतो.' त्याच्या या पोस्टवरही नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com