Hardik Pandya: ए चल निघ...! भर मैदानात हार्दिक पंड्याने साई किशोरला केली शिवीगाळ? दोघांच्या वादाचा Video Viral

Hardik Pandya vs R Sai Kishore: क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखलं जातं. पण काही वेळा सामना चालू असताना काही ना काही कारणांमुळे त्यात मतभेद निर्माण होतातच. शनिवारी आयपीएलमध्ये असाच एक भांडणाचा प्रसंग घडल्याचं दिसून आलं.
Hardik Pandya Abuse
Hardik Pandya Abusesaam tv
Published On

क्रिकेट हा जेंटलमनचा खेळ मानला जातो. मात्र अनेकदा सामना सुरु असताना यामध्ये काही कारणामुळे वादाची ठिणगी पडतेच. शनिवारी आयपीएमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. आणि या सामन्यात असंच एक वादावादिचं प्रकरण पाहायला मिळालं.

या सामन्यात साई किशोर आणि हार्दिक पांड्या यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं पहायाला मिळालं. सामन्यामध्ये गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर दबाव आणला होता. अशा वेळी काही शॉट्स किंवा विकेट्स खेळाची दिशा बदलू शकत होत्या. यावेळी साई किशोर हार्दिक पांड्याला एक चांगला बॉल टाकला. हार्दिकने त्याचा हा बॉल समोर खेळला. यावेळी बॉल उचलल्यानंतर साई किशोर हार्दिककडे पाहू लागला.

Hardik Pandya Abuse
Gt Vs Mi: W, W, W...! सलग तीन विकेट्स मिळूनही गोलंदाजाला मिळाली नाही हॅट्रिक; पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?

हार्दिक पंड्याने केली शिवीगाळ?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आर साई किशोरचं हे वागणं आवडलं नाही. त्याने हाताने इशारे करून त्याला जाण्यास सांगितलं आणि यावेळी काही अपशब्द वापरले असल्याचा दावा केला गेला. मुख्य म्हणजे यावेळी साई किशोर यांनीही प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या जवळ येऊ लागले. ते काहीही न बोलता नुसते एकमेंकाकडे बघत होते.

दरम्यान या प्रकरणी वाद वाढू नये यासाठी यानंतर अंपायरला मध्यस्थी करावी लागली आणि त्यांनी दोन्ही खेळाडूंना बाजूला केलं. ही संपूर्ण घटना मुंबई इंडियन्सच्या डावाच्या 15 व्या ओव्हरमध्ये घडली.

Hardik Pandya Abuse
Hardik Pandya Viral Video: Mumbai Indians चा कॅप्टन हार्दिक पांड्या झाला गायक, श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन; Video Viral

क्रिकेटमध्ये खेळाडूंमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी सर्रासपणे घडत असतात. आयपीएल २०२५ मध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडलेली दिसली. आयपीएलच्या गेल्या सिझनमध्ये अशाच वादामुळे केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यातील वाद जास्त टोकाला गेला नाही. मात्र, त्याचा परिणाम फेअरप्लेमध्ये नक्कीच होऊ शकतो.

Hardik Pandya Abuse
Video: धावांची चोरी तेही पांड्यासमोर Impossible! हार्दिकच्या रॉकेट थ्रोने तेवतियाच्या उडाल्या दांड्या, झाला 'डायमंड डक'चा शिकार

हार्दिकच्या कॅप्टन्समध्ये खेळलाय साई

28 वर्षीय साई किशोर आयपीएल 2022 आणि 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता. त्यावेळी हार्दिक पांड्या या टीमचा कर्णधार होता. 2022 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीमने विजेतेपदही पटकावलं होतं. त्या दोन सिझनमध्ये साई किशोरला केवळ ५ सामने खेळण्याची संधी मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com