Gt Vs Mi: W, W, W...! सलग तीन विकेट्स मिळूनही गोलंदाजाला मिळाली नाही हॅट्रिक; पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण?

IPL 2025: या वर्षीच्या आयपीएलमधील नववा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. या लढतीत गुजरात टायटन्सच्या संघाने मुंबईला ३६ धावांनी हरवलं. हा मुंबईचा लागोपाठ दुसरा पराभव ठरला.
Misses HatTrick
Misses HatTrickSAAM TV
Published On

यंदाच्या आयपीएलमध्ये ९ वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या टीमने ३६ रन्सने मुंबईचा पराभव केला. हा मुंबईचा सलग दुसरा पराभव होता. या सामन्यात गुजरात टायटन्सची टीम प्रथम फलंदाजीसाठी उतरला होती. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्स गमावून १९६ रन्स केले.

या सामन्यात गुजरातच्या फलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. मात्र यावेळी एक वेळ अशी आली जेव्हा मुंबईच्या गोलंदाजांनी या सामन्यात कमबॅक केलं. यावेळी मुंबईच्या टीमला सलग तीन बॉल्समध्ये ३ विकेट्सही मिळाल्या. मात्र तरीही कोणत्याही गोलंदाजाला हॅट्रिक मिळाली नाही.

Misses HatTrick
MI Vs GT IPL 2025 Live : मुंबईची दुसरी मॅच पण देवाला? चेन्नईनंतर गुजरातनं पाजलं पराभवाचं पाणी

सलग मिळाल्या तीन विकेट

सलग विकेट्स या १८ व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला मिळण्यास सुरुवात झाली. याच बॉलवर ट्रेंट बोल्टने सई सुदर्शनला यॉर्करवर आऊट केलं. साईने या सामन्यात ४१ चेंडूत ६३ रन्सची खेळी केली. त्यानंतर दीपक चहर १९ वी ओव्हर टाकली. दीपकच्या पहिल्याच बॉलवर शेरफेन रदरफोर्ड स्ट्राईकवर होता. रदरफोर्डने मिड ऑनला शॉट खेळला. यावेळी नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेल्या राहुल तेवतिया काहीही न पाहता रनसाठी धावू लागला.

Misses HatTrick
Video: धावांची चोरी तेही पांड्यासमोर Impossible! हार्दिकच्या रॉकेट थ्रोने तेवतियाच्या उडाल्या दांड्या, झाला 'डायमंड डक'चा शिकार

त्यावेळी मिड ऑनला असलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने रॉकेट थ्रो करत तेवतियाला नॉन स्ट्राईकर एंडला आऊट केलं. ओव्हरच्या पुढच्याच बॉलवर रदरफोर्ड पुन्हा एकदा समोर आला. रदरफोर्डने उंच शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्याचा कॅच मिचेल सॅन्टनरने घेतला. अशाप्रकारे मुंबई संघाला सलग तीन विकेट्स मिळाल्या. मात्र यावेळी एकाही गोलंदाजाची हॅटट्रिक झाली नाही.

Misses HatTrick
Hardik Pandya Viral Video: Mumbai Indians चा कॅप्टन हार्दिक पांड्या झाला गायक, श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन; Video Viral

गुजरातच्या फलंदाजांची उत्तम कामगिरी

या सामन्यात गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत १९६ रन्सपर्यंत मजल मारली. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ६३ रन्स केले. तर शुभमन गिलने 38 आणि जोस बटलरने 39 रन्स केले. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com