Shahid Afridi News: 'हे जरा अतीच झालं..', हरमनप्रीतच्या कृत्यावर शाहिद आफ्रिदी भडकला

Shahid Afridi On Harmanpreet Kaur: शाहिद आफ्रिदीने हरमनप्रीत कौरवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.
shahid afridi
shahid afridi saam tv
Published On: 

Shahid Afridi Statement On Harmanpreet Kaur: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या प्रचंड चर्चेत आहे. चर्चेत असण्याचं कारण म्हणजे, तिने बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात केलेलं कृत्य. अंपायरने LBW बाद घोषित केल्यानंतर तिने रागात स्टम्प उडवले होते.

इतकेच नव्हे तर बांगलादेशच्या कर्णधारासोबत तिने चुकीच्या शब्दांचा वापर केला. त्यामुळे आयसीसीने तिच्यावर कारवाई केली आहे. या कृत्यानंतर तिच्यावर अनेक दिग्गजांनी टीकेचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले आहे. यात आता आणखी एक भर पडली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने हरमनप्रीत कौरवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

shahid afridi
IND vs WI Playing 11: पहिल्या वनडेत रोहित 'या' खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता; पाहा संभावित प्लेइंग 11

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने समा टीव्हीसोबत बोलताना म्हटले की, 'महिला क्रिकेटमध्ये अशा घटना क्वचितच पाहायला मिळतात. मात्र हे जरा अतीच झालं. नियंत्रणात राहून राग केला तर ठीक आहे,मात्र हे अती होतं. तिला कमी शिक्षा मिळाली आहे. भविष्यात अशा चुका होऊ नये म्हणून आयसीसीने तिला मोठी शिक्षा द्यायला हवी होती. हरमनप्रीतवर मॅक फीच्या १०० टक्के आकारला गेला पाहिजे होता.'

हरमनप्रीत कौरने केलेल्या कृत्यामुळे तिच्यावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे. तिच्यावर २ सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

तर अंपायरसोबत गैरवर्तन केल्याने तिच्यावर मॅक फीच्या ५० टक्के दंड आकारला गेला आहे. तसेच सार्वजनिकरित्या अंपायरचा अपमान केल्यामुळे तिच्यावर २५ टक्के दंड आकारला गेला आहे. (Latest sports Updates In Marathi)

shahid afridi
IND vs WI ODI Series Details: कुठे, केव्हा अन् कधी रंगणार भारत-वेस्टइंडीज पहिला वनडे सामना? पाहा एकाच Click वर..

काय आहे नेमकं प्रकरण?

भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur)फलंदाजी करत होती. त्यावेळी हरमनप्रीत कौरने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू पॅडला जाऊन धडकला.खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली.

मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला. यावेळी रागात तिने बॅटही विकेटवर आपटली, त्यामुळे एक स्टंप पडला.

इतकंच नाही तर हरमनप्रीत कौर परतताना अंपायरवर रागावतानाही दिसली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com