क्रिकेट विश्वावर शोककळा, मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूचं निधन

मुंबई संघाला रणजी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या ४० वर्षीय क्रिकेटपटूचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे
Mumbai Cricket
Mumbai CricketSaam Tv
Published On: 

मुंबई : सध्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेचा (IPL 2022) १५ वा हंगाम जोमात सुरू आहे. आज आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचा सामना केएल राहूलच्या (KL Rahul) लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) विरुद्ध होणार आहे. दरम्यान, हा सामना सुरू होण्यापूर्वी क्रिडा विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मुंबईचे माजी वेगवान गोलंदाज राजेश वर्मा (Rajesh Varma) यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. (Former Mumbai Fast Bowler Rajesh Verma Passes Away)

Mumbai Cricket
IPL 2022: रोहित शर्माची जागा धोक्यात? भारतीय संघाला मिळणार नवा कर्णधार!

राजेश यांनी वयाच्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. २००७-०८ साली मुंबईच्या संघाने रणजी ट्रॉफी (Mumbai Ranji Trophy) जिंकली होती, त्या संघात राजेश वर्मा सदस्य होते. राजेश वर्मा यांचे सहकारी आणि माजी खेळाडू भाविन ठक्कर यांनी राजेश यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राजेश वर्मा यांची कारकिर्द

२००२ साली राजेश यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी ७ प्रथमश्रेणी सामने खेळले आहे. २००८ साली पंजाबच्या संघाविरुद्ध मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांनी शेवटचा सामना खेळला होता. राजेश यांनी ७ प्रथमश्रेणी सामन्यात एकूण २३ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्यांनी ११ लिस्ट ए सामन्यात २० विकेट मिळवल्या होत्या. ९७ धावा देत ५ विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com